थोरातांपुढेच मुख्यमंत्री दानवेंच्या कानात म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले ताप द्यायला लागले तर...

शिवसेना-भाजपा (Shivsena- BJP)हे समविचारी पक्ष आहेत. शिवसेना भाजपाने युतीत २५-३० वर्षे काम केलं आहे. पण शिवसेनेने राष्ट्रवादी- कॉंग्रेस सोबत घरोबा केला. पण संसारात काही अनुभव आल्याशिवाय माणूस बोलत नसतो.
ravsaheb danve.jpg
ravsaheb danve.jpg

औरंगाबाद : राज्यात सध्या शिवसेना -भाजपाच्या युतीच्या (Shivsena- BJP Alliance)  चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. अशातच आज (१७ सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत (Aurangabad)  आयोजित कार्यक्रमात अनेक आजी- माझी नेते उपस्थित होते. मात्र याठिकाणी घडलेल्या एका घटनेने संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्यक्रमा दरम्यान, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री व्यासपीठावर आल्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासमोर रावसाहेब दानवे यांच्या कानात काहीतरी बोलले. आता ते रावसाहेब दानवे यांच्या कानात काय बोलले याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत दानवेंना विचारले असता त्यांनी देखील यावर मिश्लिक भाषेत उत्तर दिले आहे. 

रावसाहेब...आज तुम्हाला शब्द देतो; मी तुमच्यासोबत आहे!
 
मुख्यमंत्र्यांनी आपल्याला परत एकत्र येण्याविषयी सांगितलं असल्याचं दानवे म्हणाले. “मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही मुंबईला येत नाही. या एकदा, बसू आपण, बाळासाहेब थोरात ऐकत होते,  काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक जर मला ताप द्यायला लागले, तर मी भाजपाला बोलवून घेतो.  पण ते मला ताप देत नाहीत. पण जर त्यांना काही अनुभव आले असतील तर एक दिवस मुंबईला जाऊ, बसू. अशी मिश्लिक प्रतिक्रीया त्यांनी दिली. तसेच यावेळी त्यांना  मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ऑफर तर दिली नाही ना असे विचारले असता,  ऑफर अशी उघड उघड देत नसतात, असे स्पष्ट केले. आम्ही समविचारी आहोत. समविचारी पक्ष एकत्र यावेत हीच भाजपची भूमिका आहे असेही त्यांनी म्हटले. 

शिवसेना-भाजपा हे समविचारी पक्ष आहेत. शिवसेना भाजपाने युतीत २५-३० वर्षे काम केलं आहे. पण शिवसेनेने राष्ट्रवादी- कॉंग्रेस सोबत घरोबा केला. पण संसारात काही अनुभव आल्याशिवाय माणूस बोलत नसतो. मुख्यमंत्र्यांना आमचाही अनुभव आहे आणि त्यांचाही आहे. पण शिवसेनेने आम्हाला सोडून तिकडे घरोबा करणे राज्यातल्या मतदारांनाआवडलेलं नाही, अजूनही शिवसेनेने भाजपाकडे परत जाव असचं मतदारांना असं वाटतंय.”, असं देखील दानवेंनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com