तरुण डीजेच्या तालावर नाचत असल्याचे पाहताच नारायण कुचे यांना ही नाचण्याचा मोह आवरता आला नाही.
जालना : वीज बिल आंदोलन करून परतत असलेल्या आमदारांनी धरला लग्नाच्या वरातीत डीजे च्या तालावर ठेका धरला अन् वऱ्हाडी मंडळीतील तरूणाचा उत्साह वाढला. हा प्रकार काल जालना येथे घडला. लॉकडाउननंतर ग्रामीण भागात लग्न समारंभाला वेग आला आहे.
अशा उत्साही वातावरणात बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे शेतकऱ्याच्या वीज बिल आंदोलन करून परतत असताना, तरुण डीजेच्या तालावर नाचत असल्याचे पाहताच नारायण कुचे यांना ही नाचण्याचा मोह आवरता आला नाही.
आमदार नारायण कुचे यांनीही या ग्रामीण भागातील तरुणासह डीजेच्या तालावर ठेका धरत, नवरदेवाची गाडी सामोर डीजेच्या तलवार दिलखुलासपणे नाचण्यास सुरवात केली अन् नवरदेवाला शुभेच्छा दिल्या. आमदारांचा ठेका पाहून वऱ्हाडी मंडळीत असलेल्या तरुणाचा ही उत्साह वाढला, आमदारांच्या या डान्स चा व्हिडिओ काही तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
क्षीरसागरांची साथ सोडणाऱ्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका
बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील काकू-नाना विकास आघाडीतून विजयी झालेल्या आणि नुकतीच त्यांची साथ सोडलेल्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी ही याचिका दाखल केली आहे.
नगरसेवक प्रभाकर जगन्नाथ पोपळे, रंजीत देविदास बनसोडे, सिता भैय्यासाहेब मोरे, कांताबाई बन्सीधर तांदळे व अश्विनी धर्मराज गुंजाळ यांच्या विरोधात दाखल याचिकेवर येत्या मंगळवारी २३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तशा नोटीसा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना बजावल्या आहेत.
संदीप क्षीरसागर यांनी मागच्या नगर पालिका निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर या दोन्ही काकांविरोधात शड्डू ठोकत आव्हान दिले. त्यावेळी राष्ट्रवादीत असल्याने पक्षाचे चिन्ह व उमेदवारींचे अधिकार जयदत्त क्षीरसागर यांना भेटले. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी काकू - नाना आघाडीची स्थापना करुन पालिका रणांगणात उडी घेतली.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा