शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखावर हल्ला 

दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून कृष्णा पाटील यांच्यावर रॉडने वार केला.
 Krishna Patil Dongaonkar .jpg
Krishna Patil Dongaonkar .jpg

गंगापूर (जि. औरंगाबाद ): गंगापूर येथील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या वाहनावर (क्र. एम. एच-२० सी. एच-९०००) अज्ञाताने रॉडने हल्ला करून काच फोडल्याची घटना गुरुवारी (ता. ४ मार्च) रात्री औरंगाबादला जात असताना हॉटेल सह्याद्रीसमोर घडली.  

याविषयी येथील पोलिस ठाण्यात डोणगावकर यांनी फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पाटील लघुशंकेसाठी उतरले असता अज्ञात दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून कृष्णा पाटील यांच्यावर रॉडने वार केला. मात्र, प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने ते बचावले. मात्र, पुढे उभ्या असलेल्या वाहनाची हल्लेखोरांनी रॉड मारुन काच फोडली.

या घटनेनंतर डोणगावकर समर्थकांनी निषेध व्यक्त केला असून, पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हे ही वाचा...

बाबरी मशिदीचा मुद्दा काढून आमच्या जखमा ताज्या करू नका
 
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, ते एकट्या शिवसेनेचे नाह. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात राजकीय भाषण करणे योग्य नव्हते. हे सरकार धर्मनिरपेक्ष आहे, मग राम मंदिर, बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उकरून का काढला जातोय? असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला. आमच्या जखमा पुन्हा ताज्या करू नका, असा इशारा देखील त्यांनी सभागृहात दिला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर काल सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपली भूमिका सभागृहात मांडली. या प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तास भाषण करत भाजपवर हल्ला चढवला होता. हिंदुत्व, राम मंदिर, बाबरी मशीद कुणी पाडली असे अनेक वादग्रस्त विषय त्यांच्या भाषणात आले. विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांचे भाषण हे राजकीय चौकातल्या सभे सारखे होते अशी टीका देखील केली.

आज पुरवणी मागण्यावर सभागृहात चर्चा सुरू असतांना मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणाचे पडसाद उमटले. सुरुवातीला भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मालाड आणि मालवणीमधून हिंदूना कसे हुसकावूण लावले जात आहे, असा मुद्दा उपस्थित केला. त्याला मंत्री असलम शेख यांनी आक्षेप घेत भाजपचा मुंबईतील तुमचा एक अध्यक्षच बांगलादेशी असल्याचा आरोप केला.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com