अमित शहा खासदार चिखलीकरांना म्हणाले, तुमच्या घरी चहा घेऊ....

अचानक घेतलेल्या यानिर्णयामुळे यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.
Amit shah & Prataprao Chikhalikar pic (19).jpg
Amit shah & Prataprao Chikhalikar pic (19).jpg

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता.१७) आपला नियोजित दौरा अटोपून नांदेडहून दिल्लीला जाणार होते, मात्र सायंकाळी शहांनी अचानक सचखंड गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर अचानक नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या घरी चहापानासाठी गेले. या अचानक घेतलेल्याय निर्णयामुळे यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. तर, खासदार चिखलीकर यांच्या घरी शहा यांनी चहापानासाठी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.

अमित शहा स्वतःच चिखलीकरांना म्हणाले तुमच्या घरी चहा घेऊ, त्यानंतर चिखलीकरांच्या घरी चहापानासाठी पोहचले. या अचानक बदललेल्या नियोजनामुळे त्यांच्या सुरक्षा यंत्रणेची मात्र, चांगलीच तारांबळ उडाली. शहांनी चिखलीकरांच्या निवासस्थानावर चहापान केल्याने भाजपसह विरोधकांच्या  भूवया ऊंचावल्या. शुक्रवारी चिखलीकरांचे कट्टर राजकीय विरोधक तसेच, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये होते. यामुळे चिखलीकरांच्या निवासस्थानावरील शहांची यांची ही भेट महत्चपूर्ण व चिखलीकरांचे राजकीय वजन वाढवणारी ठरली.

खासदार चिखलीकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, अमित शहा यांच्या भेटीमुळे चिखलीकरांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

हेही वाचा : शहा यांच्याच काळात युतीचा तुकडा पडला ; ते कोणताही चमत्कार घडवू शकतात.

मुंबई : गुजरातमधील राजकीय बदल आणि 2024 च्या निवडणुकांवर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. 'भाजपच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतलं जात आहे.

नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही', असं अग्रलेखात म्हटलं आहे.

'पश्चिम बंगालमध्ये तर अमित शहा (amit shah) यांनी जिवाची बाजी लावली होती. केरळात ई. श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. अमित शहा हे कोणताही चमत्कार घडवू शकतात अशी प्रचार मोहीम राबवली गेली, पण अमित शहा यांच्याच काळात महाराष्ट्रात 25 वर्षे जुन्या शिवसेना-भाजप युतीचा तुकडा पडला व आता तर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. प. बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच. मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत', अशी टीका शिवसेनेने केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com