माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारखान्याला सहा कोटींचा गंडा

भाऊराव साखर कारखान्याला चेन्नईच्या कंपनीने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
Sarkarnama (46).jpg
Sarkarnama (46).jpg

नांदेड :  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  Ashok Chavan यांच्या मालकीची असलेल्या भाऊराव साखर कारखान्याला , Bhaurao Sugar Factory एका चेन्नईच्या कंपनीने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी चेन्नईच्या दोघांसह तीन जणांविरोधात बारड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

भाऊराव साखर कारखान्याचे हदगाव युनिट-3 आणि वाघलवाडा येथील- 4 च्या साखर विक्रीचे टेंडर चेन्नईच्या एका कंपनीने घेतले. साखर निर्यात केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केंद्र सरकारकडून प्रतिटन कारखान्याला मदत मिळते. मात्र, चेन्नई च्या कंपनीने कुठलेही कागदपत्रे सादर न करता इंडोनेशिया देशाने तूमची साखर नाकारली असल्याचे सांगितले आणि यासंदर्भातला कुठलाही पत्रव्यवहार भाऊराव साखर कारखान्याला दिला नाही. 

जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ बंद ; अण्णा द्रुमुक आक्रमक
अहमदनगरचे अभिजित देशमुख, चेन्नईचे प्रदीपराज चंद्राबाबू आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. काल या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना चार सप्टेंबर पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याच्या कंपनीची फसवणुक झाल्याचे प्रकरण अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. 

आढळराव, आता तुम्हाला माफी नाही ; मोहितेंनी फटकारले
राजगुरूनगर (जि. पुणे) :  खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे मावळते सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील बहुचर्चित अविश्वास ठरावानंतर काल ही सभापतीपदाची निवडणूक पार पडली. चौदा सदस्यांच्या सभागृहात केवळ चार सदस्य असतानाही अखेर राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com