कोरोनाने मृत्यू झालेल्या त्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसाला मिळणार 50 लाख 

कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
The village development officer of Parbhani who died due to corona will get Rs 50 lakh
The village development officer of Parbhani who died due to corona will get Rs 50 lakh

कोल्हापूर : कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यात त्यांचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे.

या अनुषंगाने संबंधीत मृत ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसाला विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारला 12 ऑगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला तातडीने एका दिवसात मंजुरी देऊन मृत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसास 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूच्या संकटकाळात ग्रामीण भागातील कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी कोरोना योद्धा बनून काम करीत आहेत. 

या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार यांना सप्टेंबर पर्यंत 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. 

त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील संबंधीत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसांना तातडीने विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आम्ले यांच्या पत्नी श्रीमती रंजना आम्ले यांना उद्या (ता. 15 ऑगस्ट) पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या रक्कमेचा धनादेश देण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिली. 

सरकार हिमालयासारखे पाठिशी... 

कोणाचाही मृत्यू होणे, हे दुर्दैवी आहे. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यात या पहिल्या कोरोना योद्धाचा मृत्यू झाला आहे. अशा कोरोना योद्‌ध्यांच्या वारसांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार हिमालयासारखे उभे आहे. समाजानेही अशा कुटुंबीयांना मानसिक आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com