स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाने पिकवली अफू : पोलिसांंकडून गुन्हा दाखल

पिकात अफूची लागवड करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाला जालन्यातील बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
The farmer grows opium in the field .jpg
The farmer grows opium in the field .jpg

जालना : पिकात अफूची लागवड करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाला जालन्यातील बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात शेतकऱ्यांने पिकात अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

या माहितीवरून पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने या शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची पाहणी केली असता पिकात अफूची लागवड केली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या शेतकऱ्यांच्या शेतातून ९६ किलो २०० ग्राम अफूची झाडे जप्त केली. या अफूची बाजारभावानुसार  किंमत २४ लाख ५ रूपये आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्यांच्या शेतातच अफू पिकवली जात असल्याने एकच खबळ उडाली आहे.


दरम्यान, पोलिसांनी अफूची लागवड केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेल्या शेतकऱ्यांला ताब्यात घेतले असून बदनापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

हे ही वाचा... 

औरंगाबादेत कोरोना सेंटरमध्ये महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा डाॅक्टर निलंबित 

औरंगाबाद ः शहरातील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधीमंडळ अधिवेशनात देखील उमटले आहेत. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी हा प्रकार गंभीर असून संबंधित डाॅक्टरला निलंबित करण्याची मागणी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली. विधीमंडळाच्या सभागृहात देखील या घटनेचा निषेध करत आरोपी डाॅक्टरवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डाॅक्टरला तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.

शहरातील पद्मपुरा भागातील कोरोना उपचार केंद्रात एका महिला रुग्णाकडे डाॅक्टरने शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तीन दिवसांपुर्वी सदर महिला या केंद्रात उपचारासाठी दाखल झाली होती. यावेळी तिच्यावर उपचार करणाऱ्या एका डाॅक्टरने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिला रात्री गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा महिलेने आरडाओरड केल्यानंतर कोविड सेंटरमधील इतर कर्मचारी व रुग्णांनी तिकडे धाव घेत महिलेला वाचवले. सदर घटनेची माहिती महिलांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी कोविड सेंटरमध्ये धाव घेत संबंधित डाॅक्टरला बेदम मारहाण केली. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. निता पाडळकर यांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती दिली आहे.

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तसेच महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डाॅक्टरची हकालपट्टी केल्याचे सांगतिले.

मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. तत्तपुर्वी औरंगाबाद पुर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना या घटनेबद्दल संताप व्यक्त करत आरोपी डाॅक्टरला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. आरोपीवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील सावे यांनी यावेळी दिला.

याच प्रश्नावर विधानसभेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, झालेला प्रकार हा निंदनीय व संतापजनक आहे. सुदैवाने महिलेवर बलात्कार झालेला नाही. परंतु अशा प्रकारच्या घटना कोरोना सेंटरमध्ये घडने चीड आणणारे आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी डाॅक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात सदर महिलने तक्रार करण्यात नकार दिला आहे. तरीही डाॅक्टरने केलेला प्रकार पाहता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सदर महिलेचा पती व आरोपी डाॅक्टर हे मित्र असल्याचे देखील समोर आले आहे. या घटनेत महिलेचा विनयभंग झाला आहे, त्यामुळे सदर महिलेचे नाव कुठेही येऊ न देता आरोपीवर चौकशीनंतर पुढील कठोर कारवाई देखील केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com