सुरेश धस संबळ वाजवत बैलगाडीतून आले आंदोलनाला 

आष्टी-पाटोदा-शिरूर कासार विधान सभा मतदार संघातील विविध राष्ट्रीयकृत बॅंका, कृषी कार्यालयांसमोर आमदार सुरेश धस यांनी सोमवारी (ता. 13 जुलै) आंदोलन केले. संबळ वाजवित बैलगाडीतून कार्यालयांत पोचून त्यांनी सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप केला.
Suresh Dhas came to the agitation in a bullock cart
Suresh Dhas came to the agitation in a bullock cart

बीड : शेतकऱ्यांचे पीक कर्ज, दूध दरवाढ, मराठा आरक्षण, राजगृहावरील हल्ला, पीक विमा अशा विविध प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी सोमवारी (ता. 13 जुलै) आष्टी-पाटोदा-शिरुर मतदार संघात विविध बॅंका, कृषी कार्यालयांसमोर संबळ वाजवत बैलगाडीतून जाऊन आंदोलन केले. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप उद्दिष्टाच्या दहा टक्केही पीक कर्ज मिळाले नाही. मागच्या रब्बी हंगामात पिकविमा स्वीकारलेला नाही. यंदाही ऑल इंडिया इन्श्‍यूरन्स कंपनी पिक विमा स्वीकारणार असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा अद्याप सरकारी निर्णय जाहीर झालेला नाही. प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा सरकारच्या कंपनीमार्फत उतरवला जावा, 

राजगृहावर तोडफोड होत असताना सरकार नेमके काय करत होते, आरोपीला तत्काळ अटक करावी, मराठा आरक्षणावर या सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष चाललेले आहे, सारथीचे वाटोळे करण्याचे काम हे महाविकास नाही तर तिघाडीचे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. धस यांनी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार येथील विविध बॅंका व कृषी कार्यालयांसमोर सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. 

काही राष्ट्रीयकृत बॅंकांनी बनविलेले ऍप एका दिवसाला केवळ 15 ते 20 शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करु शकत असल्याने या पद्धतीने कर्ज वाटप प्रक्रिया सुरु राहिल्यास वर्ष संपले तरी कर्ज वाटप होणार नाही. हजारो अर्ज धूळ खात पडल्याचे चित्र आहे. बॅंका शेतकऱ्यांची आडवणूक करत आहे. 

निकृष्ट बियाणांमुळे सोयाबीन उगवले नाही. मात्र, कृषी विभाग या कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी त्यांनी केली. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीतील फळबागांची हेक्‍टरी 18 हजार रुपये नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 

या आंदोलनात बद्रिनाथ जगताप, यशवंत खंडागळे, जिया बेग, खंडू जाधव, किशोर हंबर्डे, सुधीर पठाडे, महेश हंबर्डे, सुरेश वारंगुळे आदींनी सहभाग घेतला. आष्टी, पाटोदा, शिरुर कासारसह कडा, धानोरा, धामणगाव, पिंपळा, दौलावडगाव, खडकत, सांगवी पाटण, जळगाव आदी ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com