मोठी बातमी : अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक  

चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे.
 Ashok Chavan .jpg
Ashok Chavan .jpg

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Stone throwing at Ashok Chavan's house) 

दगडफेक करणारी महिला माथेफिरू असल्याचा प्राथमिक आंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. सिसीटीव्ही तपासून दगडफेक करणाऱ्या महिलेचा पोलिस शोध घेत आहेत. चव्हाण यांच्या घरावर या महिलेने कोणत्या कारणाने दगडफेक केली याचाही शोध पोलिस घेत आहेत. या दगडफेकीमध्ये चव्हाण यांच्या घराच्या काचा फुटल्याची माहिती आहे. 

दरम्यान, चव्हाण यांच्या मालकीची असलेल्या भाऊराव साखर कारखान्याला , Bhaurao Sugar Factory एका चेन्नईच्या कंपनीने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी चेन्नईच्या दोघांसह तीन जणांविरोधात बारड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

भाऊराव साखर कारखान्याचे हदगाव युनिट-3 आणि वाघलवाडा येथील- 4 च्या साखर विक्रीचे टेंडर चेन्नईच्या एका कंपनीने घेतले. साखर निर्यात केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केंद्र सरकारकडून प्रतिटन कारखान्याला मदत मिळते. मात्र, चेन्नई च्या कंपनीने कुठलेही कागदपत्रे सादर न करता इंडोनेशिया देशाने तूमची साखर नाकारली असल्याचे सांगितले आणि यासंदर्भातला कुठलाही पत्रव्यवहार भाऊराव साखर कारखान्याला दिला नाही. 

अहमदनगरचे अभिजित देशमुख, चेन्नईचे प्रदीपराज चंद्राबाबू आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. काल या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना चार सप्टेंबर पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याच्या कंपनीची फसवणुक झाल्याचे प्रकरण अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com