लातूरमध्ये स्थायी समिती सभापती निवडीला ‘ब्रेक’ - Standing Committee Elections in Latur Postponed for corona | Politics Marathi News - Sarkarnama

लातूरमध्ये स्थायी समिती सभापती निवडीला ‘ब्रेक’

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वच निवडी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे येथील महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी आपणच विराजमान होणार असे वाटणाऱ्या काँग्रेसच्या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे

लातूर :  येथील महापालिकेत काँग्रेसचा Indian National Congress महापौर आणि भाजपचा BJP स्थायी समितीचा सभापती अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यात आज (ता. १२) स्थायी समिती सभापतींची निवड करावी असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्याची प्रक्रियाही सुरू होती. Standing Committee Elections in Latur Postponed for corona 

पण, राज्यात Maharashtra कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वच निवडी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे येथील Latur महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी आपणच विराजमान होणार असे वाटणाऱ्या काँग्रेसच्या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.

सद्यःस्थितीत राज्यात कोविड १९ संक्रमणाचा प्रादूर्भाव प्रचंड वेगाने होत आहे. वाढती रुग्ण संख्या आरोग्य सुविधांवर असणारा ताण, संक्रमणात होत असणारी वाढ यामुळे कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाचे कडक निर्बंधाचे आदेश आहेत. ही वस्तुस्थिती विचार घेऊन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या स्थायी समिती व विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. 

राज्यातील कोविड-१९ संक्रमण परिस्थितीचा आढावा एक महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशिलांच्या आधारे घेऊन सदर निवडणुकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, तसे आदेश नगरविकास विभागाचे Urban Development Department अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत. त्यामुळे येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीला ब्रेक लागला आहे.Standing Committee Elections in Latur Postponed for corona 

येथील स्थायी समितीच्या सभापतींची मुदत गेल्या वर्षीच संपली आहे. पण, कोरोनामुळे त्यांना सातत्याने मुदतवाढ मिळत गेली. त्यात विभागीय आयुक्तांनी या समितीच्या सभापतिपदाचा निवड सोमवारी (ता. १२) करावी असे आदेश दिले होते. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारीही सुरू केली होती. बैठकीचा अजेंडाही तयार केला होता. सध्या या समितीचे सभापती भाजपचे ॲड. दीपक मठपती हे आहेत. या समितीवर काँग्रेस व भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी आठ सदस्य आहेत. दरवर्षी काही सदस्य निवृत्त होतात व त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांना संधी दिली जाते. 

भाजपचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचे समितीवरील सदस्यत्व उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यांच्या जागी भाजपने जान्हवी सूर्यवंशी यांना संधी दिली. पण, इतर दोन नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत महापौरांकडे वेळेत नाव न गेल्याने त्यांच्या जागा रिक्तच आहेत. काँग्रेसचे मात्र आठही सदस्य आहेत. सोमवारी निवड झाली असती तर काँग्रेसचाच सभापती झाला असता. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह होता. पण, आता त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. Standing Committee Elections in Latur Postponed for corona 

ॲड. मठपती ठरले नशीबवान
स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे ॲड. दीपक मठपती हे एप्रिल २०१९ मध्ये सभापती झाले. त्यांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली. पण कोरोना सुरू झाल्याने त्यांना मुदत वाढ देण्यात आली. एक वर्षभर पुन्हा ते सभापती राहिले. आता त्यांची मुदत ता. ३० एप्रिल २०२१ ला संपणार होती. पुन्हा कोरोनामुळे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. आता त्यांचे हे तिसरे वर्ष सुरू झाले आहे. खऱ्या अर्थाने ते नशीबवान ठरले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख