धनंजय मुंडेंच्या पीकविम्याच्या दाव्याबाबत प्रीतम मुंडे म्हणतात... 

शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी आपण पाठपुरावा करत असून यापूर्वी देखील पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात पत्र व्यवहार केला. काही लोकांकडून जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात असा कोणताही आदेश दिला नसल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले.
Pritam Munde says about Dhananjay Munde's crop insurance claim ...
Pritam Munde says about Dhananjay Munde's crop insurance claim ...

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा असलेल्या पिक विमा प्रश्नावर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यासाठी तत्काळ विमा कंपनी नियुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी या वेळी निवेदनाद्वारे केली. 

बीड जिल्ह्यासाठी मागच्या वर्षीच्या रब्बी हंगामासाठी पीक विमा कंपनीची नेमणूक झाली नव्हती. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पिकांचे विमा संरक्षण करता आले नाही. त्यातून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावले लागले होते. यंदाही जिल्ह्यात पिक विम्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यासाठी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी विमा स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते. याबाबत पाठपुरावा केल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, अद्याप असा कोणताही आदेश किंवा सरकारी निर्णय झाला नसल्याचेही डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या. 

विमा कंपनीची नेमणूक करणे, हा विषय पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा आहे. परंतु, राज्य सरकारकडून पुरेसे प्रयत्न होताना दिसत नसल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त करण्यास प्रयत्न करावेत, अशी मागणी केल्याचे डॉ. मुंडे म्हणाल्या. 

शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे, याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत असून यापूर्वीदेखील पंतप्रधान कार्यालय, तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात पत्र व्यवहार केला. दरम्यान, आपल्या मागणीला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी काही कंपन्यांशी चर्चा करून सकारात्मक पावले उचलले जातील, असे आश्वासन दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

सतत दुष्काळ व नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनी नियुक्त करण्यात यावी यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला. 


Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com