Parbhani MP Sanjay Jadhav Wants Cotton University in District | Sarkarnama

परभणीला कापूस विद्यापीठ स्थापनेची खासदार संजय जाधव यांची लोकसभेत मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

राज्यात कापसासाठी मराठवाडा प्रसिद्ध असून येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण केवळ कापसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत परभणी येथे कापूसप्रक्रिया उद्योग नसल्याने अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परभणी येथे कापूस विद्यापीठ तथा कापूसप्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात यावा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी (ता.१५) लोकसभेत केली.

परभणी : राज्यात कापसासाठी मराठवाडा प्रसिद्ध असून येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण केवळ कापसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत परभणी येथे कापूसप्रक्रिया उद्योग नसल्याने अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परभणी येथे कापूस विद्यापीठ तथा कापूसप्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात यावा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी (ता.१५) लोकसभेत केली.

''या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कापूस या पिकावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणे आवश्यक आहे. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कापसावर अवलंबून असतानाही केवळ परभणी येथे कापसावर प्रक्रिया करणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नसल्याने येथील शेतकऱ्यांना तमिळनाडूसह अन्य राज्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी या भागातील कापूस उत्पादक परावलंबी आहेत. त्यांचा खर्च होतो; पण फायदा मात्र होत नाही. अशा परिस्थितीत परभणी लोकसभा मतदारसंघात कापूस विद्यापीठ तथा कापूसप्रक्रिया उद्योग निर्माण करण्यात यावा,'' असे संजय जाधव म्हणाले.

''जर या भागात कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले तर शेतकऱ्यांना अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि त्यांचा खर्चही वाचेल. तसेच कापूस प्रक्रिया उद्योगामुळे या भागातील बेरोजगारी दूर होईल. कापसावरील प्रक्रिया उद्योगामुळे केंद्र व राज्य सरकारला महसूलही मिळेल. त्यामुळे परभणी येथे कापूस विद्यापीठ तथा कापूस प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात यावा,'' अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी लोकसभेत केली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख