'राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ'; शिवसेना खासदाराचा इशारा     

जिल्हाधिकारी प्रकरणात राष्ट्रवादीने खूप रान पेटवले
'राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ'; शिवसेना खासदाराचा इशारा     
Uddhav Thackeray, Sharad Pawar .jpg

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांच्या नियुक्तीवरुन बरेच राजकारण झाले आहे. त्या संदर्भात आता शिवसेनेचे परभणीचे खासदार बंडू जाधव  (sanjay Jadhav) यांनी खुलासा केला आहे. गोयल या जिल्हाधिकारी नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती, अशी कबुली जाधव यांनी दिली. त्याच बरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. (MP Sanjay Jadhav criticizes NCP) 

यावेळी जाधव म्हणाले, काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचे. वेळ आली तर माकडीनसुद्धा पिलाला पायाखाली घेते, तसे आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले. जिल्हाधिकारी प्रकरणात राष्ट्रवादीने खूप रान पेटवले. पण राष्ट्रवादी वाल्यांनी याचा बागुलबुवा केला. आपल ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच बघायचे वाकून, अशी राष्ट्रवादीवाल्यांची पद्धत आहे. असेही जाधव म्हणाले.

राष्ट्रवादी वाल्याचा अन्याय सुरु असून राष्ट्रवादी वाल्यांना आम्ही कधीही पायाखाली घालू शकतो, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये राजकारण पाह्याला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच बरोबर युती होणारच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत. असेही त्यांनी सांगितले. गाव तिथे शिवसेना असली पाहीजे असे त्यांनी कार्यकर्त्यां सांगितले.

संजय जाधव यांच्या गेल्या वर्षी राजीनाम्यानंतर जिल्ह्यासह राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदारांच्या बैठकीनंतर जाधव यांनी राजीनामा मागे घेतला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या नियुक्ती नंतरपुन्हा राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात वाद सुरु झाला आहे.

दरम्यान, पदभार घेण्यासाठी परभणीत दाखल झाल्येल्या आंचल गोयल यांना राजकीय हस्तक्षेपामुळे पदभार न घेताल माघारी जावे लागले होते. मात्र, हा प्रकार समजताच परभणीकर व काही सामाजिक संघटना आक्रमक होत रस्त्यावर उतल्या होत्या. राज्यस्तरावर देखील अनेक वेगवान घडामोडी झाल्या आणि अखेर पुन्हा गोयल यांनाच जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर गोयल यांनी कागदोपत्री पदभार स्वीकारला.   

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in