गुन्हा दाखल झाला तरी मला काही फरक पडत नाही : शिवसेना आमदाराची दर्पोक्ती   

आमच्या नेत्यावर जर अशी टीका केली जात असेल, तर आम्ही सहन करणार नाही.
 Santosh Bangar .jpg
Santosh Bangar .jpg

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना आमदारांची जीभ घसरली. मंगळवारी राणे यांच्या विरोधात बोलताना आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. 'पोलिस संरक्षण बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढतो' असे बांगर म्हणाले होते. यामुळे बांगर यांच्यावर गुन्हा दाखल होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या विषयी बांगर यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधला. यावेळी बांगर म्हणाले, गुन्हा दाखल झाला तरी काही हरकत नाही. (Shiv Sena MLA Santosh Bangar criticizes Narayan Rane) 

बांगर यावेळी म्हणाले की, आमच्या नेत्यावर जर अशी टीका केली जात असेल, तर आम्ही सहन करणार नाही. गुन्हे दाखल झाले तरी काही फरक पडणार नाही'  असे आमदार बांगर यांनी सांगितले. मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री जामीन मंजूर झाला आहे. 

काय म्हणाले होते बांगर

राणे यांच्या घरात घुसून त्यांचा कोथळा बाहेर काढू शकतो, फक्त पोलिस संरक्षण बाजूला करा' या खुलेआम दिलेल्या धमकीमुळे भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष अजून पेटला आहे. याबाबत बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप कडून केली जात आहे. दुसऱ्या बाजूला यावर प्रतिक्रिया देतांना बांगर यांनी गुन्हा दाखल झाला तरी काही फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, माझे कोणी वाकडे करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. शिवसेनेच्या वाढीत माझा मोठा सहभाग आहे. आता जे शिवसेनेत आहेत तेव्हा ते तेव्हा नव्हते. तेव्हा माझी भाषा त्यांना खटकली नाही. पण तुम्ही माझ्याविरुद्ध आंदोलन करू मला घाबरवू शकत नाही. तुम्हालाही मुलंबाळं आहेत. घरंदारं आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा शिवसेनेला आव्हान दिले.

राणे यांनी आज पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला. त्यात माझा काय गुन्हा होता, हे मला कळाले नसल्याचे पुन्हा सांगितले. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मी ते वाक्य पुन्हा उच्चारणार नाही. पण अशीच भाषा शिवसेनेच्या इतर नेत्यांनी वेळोवेळी वापरली होती, असा दावा त्यांनी केला.   

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com