करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच; तुरुगांतील मुक्काम वाढला  
Karuna Munde .jpg

करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच; तुरुगांतील मुक्काम वाढला  

न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात करण्यात आली होती.

बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma-Munde) यांच्या जामिनावर आज  (ता. १४ सप्टेंबर)  न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे त्यांचा तुरुगांतील मुक्काम वाढला आहे. (Karuna Munde was remanded in judicial custody till September 18)  

करूणा शर्मा- मुंडे आणि ड्रायव्हर अरूण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, परळीत येऊन पत्रकार परिषद घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरुन जाहीर केले होते. 

त्यानुसार त्या परळीत पोचल्या. मात्र, मुंडे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’ असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर, अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याची फिर्याद घाडगे यांनी दिली होती. यावरुन करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. 

यावरुन परळी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. स. सापतनेकर यांच्यासमोर शर्मा व मोरे यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या अर्जावरील सुनावणी पढे ढकल्यामुळे त्यांचा तुरुगांतील मुक्काम वाढला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in