परभणीत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आयसीयू हॉस्पिटल; नवाब मलिक यांची माहिती

आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळाची निश्रि्चतच मोठी कमतरता आहे. या मर्यादा ओळखूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयच्या या कोरोना सेंटरमधुन आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ५० बेडचे आयसीयू हॉस्पिटल कार्यान्वित केले जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
ICU Hospital will be erected in Parbhani With Private Help Informs Nawab Malik
ICU Hospital will be erected in Parbhani With Private Help Informs Nawab Malik

परभणी :  आगामी काळात जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता गृहित धरून परभणी जिल्ह्यासाठी ५० खाटांचे रुग्णालय आउटसोर्सींगच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. हे रुग्णालय आयटीआय इमारतीमध्ये सुरु करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी (ता.१७) पत्रकाराशी बोलतांना दिली.

जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पालकमंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिकेचे आयुक्त देविदासराव पवार यांची उपस्थिती होती.

आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळाची निश्रि्चतच मोठी कमतरता आहे. या मर्यादा ओळखूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयच्या या कोरोना सेंटरमधुन आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ५० बेडचे आयसीयू हॉस्पिटल कार्यान्वित केले जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विशेषतः जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आला आहे. या हॉस्पिलमधून ५० बेड व्यतिरीक्त कोविड रुग्णांकरिता डायलिसिससह अन्य अत्यावश्यक सेवा तेथे पुरवल्या जाणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या कक्षात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने प्रथम घेतला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णाला पाहण्याची व्यवस्था झाली. होम क्वारंटाईन व होम आयसोलेशन करण्याचा पर्यायही प्रशासनाने मागील महिन्यात घेतला होता. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली. त्यानंतरच अन्य जिल्ह्यामध्ये याप्रकाराची अंमलबजावणी झाली आहे. जिल्हा परिषदेने गावपातळीवर सर्वेक्षणास दोन महिन्यांपूर्वीच सुरूवात केली होती. त्यातून विविध प्रकारचे आजार असलेले रुग्ण समोर आले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत अशा प्रकारचे राज्यभर सर्वेक्षण सुरु होत असल्याने याचे श्रेय परभणी प्रशासनाला जाते. त्यादृष्टीने आपण येथील प्रशासकीय अधिका-यां सोबत वारंवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी इतरत्र अलिकडे होवू लागली आहे असेही मलिक यांनी सांगितले.

दारोदार जावून नागरीकांची तपासणी होणार
जिल्ह्यात नागरिकांची तपासणी करण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार (ता.१८) पासून जिल्हयात केला जाणार आहे.  या माध्यमातून घरोघरी रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. प्रशासनाने विशेषतः जिल्हा परिषदेने जिल्ह्यात यापुर्वीच सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. त्यातून विविध प्रकारचे आजार असलेले रुग्ण समोर आले आहेत. या मोहिमेतही आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी डोअर-टू -डोअर जावून सर्वेक्षण करणार आहेत. त्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचा शोध लागणार आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वीत केली जाणार आहे.

भरारी पथका कडून खासगी रुग्णालयांची तपासणी
जिल्ह्यात खासगी रुग्णालयांचीही आता भरारी पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. गंभीर व सर्वसामान्य रूग्णांची माहिती घेतली जाणार आहेत. डॅशबोर्डच्या माध्यमातून सरकारी व खासगी रुग्णालयातील उपलब्ध  खाटांची संख्या दररोज जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना या पर्याया बरोबरच गंभीर नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेटेड़ची सुविधा मिळणार आहे. खासगी  रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे खासगी रुग्णालयांतून गंभीर व सर्वसामान्य बाधीत रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. सक्तीने अ‍ॅडमीट करून ठेवणा-यांवर कारवाई केली जाणार आहे
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com