परभणी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होते आहे. सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आजही मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये 37 पैशांची वाढ झाली. डिझेलही 39 पैशांनी वाढले आहे. मुंबईत आज पेट्रोल ९६.९४ रुपये आहे तर डिझेल ८८.०१ रुपये बघायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोल व डिजेलमध्ये ३८ पैशांची वाढ झाली. त्यामुळे परभणीमध्ये पेट्रोल ९९.१२ पैसे प्रतिलिटर व डिजेल ८८.७६ पैसे प्रतिलिटर झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेल सर्वांत महाग परभणीकराणा खरेदी करावे लागत आहे. परभणीत आज पेट्रोलच्या किमतीने गगनभरारी झेप घेतली असून परभणीत काल पेट्रोल ९८.७४ होते. त्यात ३८ पैशांची वाढ झाली त्यामुळे पेट्रोलचे दर ९९.१२ पैसे झाले. डिझेल काल ८८.३८ पैसे इतके होते त्यात 33पैशांची वाढ झाल्याने ८८.७६ इतका दर झाला आहे. पॉवर पेट्रोलने तर केंव्हाच सेंच्युरी पार केली आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेल सर्वांत महाग परभणीकराणा खरेदी करावे लागते. पेट्रोलच्या भावत सातत्याने वाढ होत आहे. परभणीमध्ये पेट्रोल सेंच्युरी करण्यास केवळ 88 पैसे बाकी असून नागरिक पेट्रोलच्या सेंच्युरीची वाट पाहत आहेत.
मोदी हे तो मुनकीन है : पेट्रोल शंभरीत गेल्याने नागरिकांना जुनी वचने, आश्वासने आठवली...
सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा प्रभाव हा सामान्य नागरिकांवरच पडत आहे. कारण विमानांना लागणार्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत आणि पेट्रोल आणि डिझेल वर लागणारा सेस तर बिलकूल नाही. नुकत्याच जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी अधिभार सुध्दा फक्त पेट्रोल व डिझेल वर लावला गेला आहे. जो विमानाच्या इंधनावर लावला गेलेला नाही. परीणामी ट्रकच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन ४० टक्के स्वस्त म्हणजे ५५ रुपये प्रतिलिटर आहे.
विमानाचे इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा ४० टक्के स्वस्त
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी ६ पासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या संकेतस्थळावर मिळेल. देशातील काही शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आहेत.
Edited By - Amol Jaybhaye

