म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना मोफत उपचार हवे असतील तर...

पिडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणे ही प्रक्रिया सध्या पूर्ण राज्यात सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
 Rajesh Tope ,.png
Rajesh Tope ,.png

जालना : आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर कोरोनाची (Kovid-19)तिसरी लाट येणार नाही, अशी शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली. तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना देवाकडे करतो. तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून प्रत्त्येक जिल्ह्यात पिडियाट्रिकचे वार्ड तयार करणे, पिडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणे ही प्रक्रिया सध्या पूर्ण राज्यात सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली. (The government is taking measures to prevent a third wave of corona)

जालना जिल्हा परिषदेवर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त टोपे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी टोपे म्हणाले की म्युकरमायकोसिसच्या रूग्णांना मोफत उपचार करून घ्यायचे असतील तर या रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबरोबरच शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे, यासाठी राज्यातील महात्मा ज्योतीबा फुले योजनेतील  131 रुग्णालयांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

म्युकरमायकोसीस रुग्णांकडून खाजगी रुग्णालयानी जास्त पैसे उकळू नये म्हणून क्लास ABC अशा पध्दतीने शहरांची वर्गवारी तयार करण्यात आली असून त्यानुसार बिल आकारण्यात येईल. मात्र, ते बिल 2 ते 5 लाखांच्या आतच असेल असे ते म्हणाले. राज्यात लावलेल्या लॉकडाऊनमुळे चांगले परीणाम झालेले दिसून आले असून राज्यातील 7 लाख असलेली कोरोनाबाधिततांची संख्या 2 लाखांवर आली. लसींची उपलब्धता नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना राज्यात लसीकरण बंद आहे. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना जलदगतीने लसीकरण करण्यासाठी परदेशातून लस मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी झाली असून लहान मुलांना धोका पोहचू नये यासाठी केंद्राने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार आवश्यक तयारी झाली असल्याचे टोपे म्हणाले. सोमवार पासून लेव्हल एक ते चार पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार लेव्हल एक मधील जिल्ह्यांना दुकाने उघडण्यासाठी कोणतेही निर्बध असणार नाहीत. लेव्हल दोन मध्ये जास्त निर्बध नसले तरी चार वाजेपर्यंत दुकाने उघडे येणार आहेत. लेव्हल चार मध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com