अमरसिंह पंडित उभाणार २०० खाटांचे कोविड केअर सेंटर

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अमरसिंह पंडित यांनी भवानी शिक्षणसंस्थे कडून आरोग्य विभागाला तीन व्हेंटीलेटर्स, एक्स - रे मशिन दिली होती. आता ते २०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करत आहेत.
Amarsingh Pandit  .jpg
Amarsingh Pandit .jpg

गेवराई (जि. बीड) : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा होरपळून जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, लस, खाटा अशा सर्वंच बाबींचा तुटवडा जाणवत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित मतदीला धाऊन आले आहेत. त्यांनी तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेतही अमरसिंह पंडित यांनी आरोग्य यंत्रणेला तीन व्हेंटीलेटर्स, एक्स रे मशिनसह इतर साहित्य भेट दिले होते. आताही दुसऱ्या लाटेचा कहर अधिकच असल्याने त्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. जिल्ह्याची रुग्णसंख्या ३२ हजारांपर्यंत गेली असून साडेपाच हजारांवर सक्रीय रुग्ण जिल्ह्यात आहेत. विशेष म्हणजे पहिल्या लाटेत एका दिवशी रुग्ण आढळण्याचा सर्वोच्च आकडा ४०४ होता. तर, सप्टेंबर २०२० या महिन्यात २७२० ही सक्रीय रुग्णांची सर्वोच्च संख्या नोंदली गेली होती.

दुसऱ्या लाटेत मात्र दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आठशेंच्या घरात पोचली आहे. तर, सक्रीय रुग्णांचा आकडा साडेपाच हजारांवर पोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने जोरदार तयारी केली असली तरी खाटा, ऑक्सीजन बेडची कमतरता जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार जोरात सुरु आहे. लस संपल्याने लसीकरणही ठप्प झाले आहे. अशा कठीण काळात अमरसिंह पंडित यांनी सकारात्मक आणि लोकपयोगी पाऊल टाकले आहे. 

त्यांच्या शिक्षण संस्थेच्या संकुलात आरोग्य विभागाच्या मदतीने ते दोनशे खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करत आहेत. या ठिकाणी ऑक्सीजन सुविधाही असणार आहे. पुढील आठवड्यात पहिल्या टप्यात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार आहे. या तयारीसाठी त्यांनी तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या उपस्थितीत तयारी बैठकही घेतली.

सुविधांचा आढावा घेवुन त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याशीही दुरध्वनीवरुनही चर्चा केली. शिवाजीनगर (गढी) येथील जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीमध्ये हे सेंटर सुरु होणार आहे. गेवराई तालुक्यातील रुग्णांची उपचारासाठी होणारी कसरत यामुळे थांबण्यास मदत होणार आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवरचा मोठा भार कमी होणार आहे. केवळ उपदेश आणि सल्ला न देता माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी थेट मदत करण्याचा संकल्प केला आहे.

 Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com