लाचलुचपतचा असाही कारभार; विभागातील सहाय्यक निरीक्षकावरच लाचेचा गुन्हा  - Filed a case against the Assistant Inspector of anti-corruption bureau | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

लाचलुचपतचा असाही कारभार; विभागातील सहाय्यक निरीक्षकावरच लाचेचा गुन्हा 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 जून 2021

गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी  राजकुमार पाडवी याने चिठ्ठीवर दोन लाख रुपयांचा आकडा लिहून लाच मागिती तर त्याचा लेखणीक अंमलदार प्रदीप वीर याने ५० हजार रुपयांची लाच मागितली.

बीड : लाच घेताना पकडलेल्या शाखा अभियंत्यास गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याच (anti-corruption bureau) सहायक निरीक्षकासह अंमलदाराने लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक बीडमध्ये धडकले. (Filed a case against the Assistant Inspector of anti-corruption bureau)

गेवराई तालुक्यातील एका गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रकावर तांत्रिक मान्यता देण्यासाठी पंचायत समितीतील पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता शेख समद नूर मोहम्मद यास एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने एप्रिल महिन्यात ही कारवाई कली होती. 

हे ही वाचा : भाजप अस्वस्थ; गणेश गितेंसह शहाणे संजय राऊतांच्या दरबारी

याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्याकडे होता. गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी  राजकुमार पाडवी याने चिठ्ठीवर दोन लाख रुपयांचा आकडा लिहून लाच मागिती तर त्याचा लेखणीक अंमलदार प्रदीप वीर याने ५० हजार रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार शेख समद नूर यांचे बंधू जमीलोद्दीन शेख यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांसह औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्याकडे केली होती. 

हे ही वाचा : खडसे, राजू शेट्टींचे नाव कुठयं...याचा फैसला होणार

तक्रारीच्या अनुषंगाने अपर महासंचालक कार्यालयाने चौकशी केली, त्यात सहायक निरीक्षक राजकुमार पाडवी व अंमलदार प्रदीप वीर या दोघांनाही दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर पाडवीची पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली केली होती. प्रदीप वीर यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागातून कार्यमुक्त करुन जिल्हा पोलीस दलात परत पाठविले होते.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख