Chakur Panchayat Samiti Former Speaker's  killed by his own son
Chakur Panchayat Samiti Former Speaker's killed by his own son

चाकूरच्या माजी सभापतीचा मुलानेच केला खून 

चाकूर (जि. लातूर) तालुक्‍यातील लातूररोड येथील पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत मारापल्ले यांच्या डोक्‍यात कडप्पा फरशीचे तुकड्याने गंभीरपणे मारून त्यांचा खून करण्यात आला

लातूर : चाकूर (जि. लातूर) तालुक्‍यातील लातूररोड येथील पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत मारापल्ले यांच्या डोक्‍यात कडप्पा फरशीचे तुकड्याने गंभीरपणे मारून त्यांचा खून करण्यात आला.

याबाबतची फिर्याद उत्तम गुंडप्पा मारापल्ले यांनी दिली. या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात चंद्रकांत मारापल्ले यांचा मुलगा धंनजय चंद्रकांत मारापल्ले याच्या विरोधात वडिलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाकूर पोलिसांनी धनंजय मारापल्ले यास अटक करण्यात आली आहे. धनंजय हा सतत दारू पिऊन, "मला व माझ्या पत्नीला वेगळे राहायचे आहे. मला माझी शेताची वाटणी द्या,' असे म्हणून वडील चंद्रकांत मारापल्ले यांच्याशी सतत वाद घालत होता. वाटणीमुळेच धनंजय याने स्वतःच्या वडिलांचा खून केला, अशी माहिती उत्तम मारापल्ले यांनी चाकूर पोलिसांना दिली आहे.

अशा स्वरूपाची फिर्याद दिल्यानंतर चाकूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर धनंजय मारापल्ले यास अटक करण्यात आली आहे. चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयंतराव चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 
 

चार दरोडेखोर जेरबंद 

वालचंदनगर (पुणे)  : चिखली (ता. इंदापूर) येथे एक वर्षापूर्वी दरोडा टाकून 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चार दरोडेखोरांना वालचंदनगर पोलिसांनी जेरबंद केले.

या प्रकरणी पोलिसांनी किरण ज्ञानदेव झेंडे (वय 23), अक्षय नारायण पाटोळे (वय 23), भीमा ऊर्फ अजय मोहन पाटोळे (वय 20, तिघेही रा. धर्मपुरी, ता. माळशिरस जि. सोलापूर) व तानाजी युवराज भोसले (वय 23, रा. मुंजवडी, ता. फलटण जि. सातारा) यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली. 

चिखलीजवळील निकमवस्ती येथे 20 जून 2019 रोजी पोकलेन मशिनचे काम सुरु होते. काम संपल्यानंतर रात्रीच्या वेळी केदार आनंदराव घोरबांड व त्यांचा मित्र मशिनजवळ झोपले. रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास वरील चौघांनी दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील सव्वीस हजार पाचशे रोख रक्कम, चांदीच्या दोन अंगठ्या व तीन मोबाईल हॅंन्डसेट असा पन्नास हजार 900 रुपयांचा चोरुन नेला होता. 

या प्रकरणी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक संजीवकुमार धोतरे, पोलिस नाईक संदीप मोकाशी, मोहन ठोंबरे, लक्ष्मण साळवे, मोनिका मोहिते यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या जोरावर तपास करुन दरोडेखोऱ्यांना जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींना इंदापूर न्यायलयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 24 जूनपर्यंत त्यांना पोलिस कोठडी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com