ओबीसींच्या हक्कावर गदा येत असेल तर मंत्रिपदावर पाणी सोडू : वडेट्टीवार 

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही आमची भूमिका आहे.
If the right of OBCs is being attacked, I will resign from the minister : Vadettiwar
If the right of OBCs is being attacked, I will resign from the minister : Vadettiwar

जालना : ओबीसी समाजाचे न्यायहक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे ओबीसी, विमुक्त जाती भटक्‍या जमाती कल्याण तसेच मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (ता. 5 डिसेंबर) जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

जालना जिल्हा कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या निवासस्थानी मंत्री वडेट्टीवार यांनी शनिवारी सदिच्छा दिली. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले, "आरक्षण हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्यायहक्क मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.'' 

"नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात भाजपची विजयाची परंपरा ओबीसी समाज एकजूट झाल्याने आणि तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे मोडीत निघाली आहे. या मतदार संघातील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामुळे भाजपच्या विचारांविरुद्ध देशामध्ये मोठा संदेश गेला आहे,' असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. 

या वेळी आमदार राजेश राठोड, बबनराव तायवडे, बाळासाहेब सानप, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद, प्रदेश सचिव प्रा. सत्संग मुंढे, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस राम सावंत आदी उपस्थित होते. 

 नेतृत्वावरून वाद 

करमाड (जि. औरंगाबाद) : लाडगाव येथे आज ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या मराठवाडा विभागीय बैठकीत नेतृत्वावरून वाद झाला. बॅनरबाजीवरून काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांना महत्त्व न दिल्याचा आरोप करीत समता परिषदेकडून घोषणाबाजी करण्यात आली. 

बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. जालना महामार्गावर ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरवर आयोजक म्हणून सानप यांचा ओबीसी नेते म्हणून उल्लेख होता. त्यावर गोपीनाथ मुंडे यांचेही छायाचित्र प्रसिद्ध केले होते. वडेट्टीवार यांचे फक्त छायाचित्र होते. त्यांचे नाव व पदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. 

त्याच वेळी कार्यक्रमात बालाजी शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्याविषयी नकारात्मकता वक्तव्य केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. कार्यक्रम स्थळावरील बॅनरवरही छगन भुजबळ यांचे छायाचित्र छापलेले नव्हते. यावरही कार्यक्रमात खडाजंगी झाली. शेवटी वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करत भुजबळ यांचे समाजाविषयीचे कार्य मोठे असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com