धनंजय मुंडे प्रकरणावर बीडमधील भाजप नेत्यांची चुप्पी 

सुरुवातीला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि आता राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. दोन्ही प्रकरणांत राष्ट्रवादीने सोशल मीडियातून नेत्यांना समर्थन दिले.
BJP leaders in Beed remain silent on Dhananjay Munde case
BJP leaders in Beed remain silent on Dhananjay Munde case

बीड : महिलांबाबत कुठलाही अनुचित प्रकार, कोणावर आरोप झाला कि विविध पक्षांच्या विरोधात आंदोलने नवी नाहीत. त्यात महिला आघाड्या एकमेकांच्या विरोधात आक्रमक होतात. अगदी सरकारने एखादा निर्णय घेतला तरी विरोधी पक्ष त्या विरोधात आंदोलनाला तयारच असतो. पण, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व आता राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप झाले. दोन्ही प्रकरणांत राष्ट्रवादीने चुकीचे आरोप केला म्हणत संताप व्यक्त करुन आपल्या नेत्यांना समर्थनही दिले. पण, दोन्ही प्रकरणांत बीड जिल्ह्यातील भाजप मात्र शांतच आहे. 

डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर बलत्काराचा गुन्हा नोंद झाला. शिकवणी घेणाऱ्या तरुणीला नोकरीचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली औरंगाबादेत हा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, सुरुवातीला "तो मी नव्हेच' असा पवित्रा शेख यांनी घेतला. नंतर शिरूर कासारमध्ये महेबूब शेख नावाची दुसरी व्यक्तीच नसल्याने गुन्हा नोंद झालेला व्यक्ती महेबूब शेखच असल्याचे स्पष्ट झाले आणि मग आरोप-प्रत्यारोप, खुलासे सुरु झाले. त्यावेळीही महेबूब शेख यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समर्थन केले.

सोशल मीडियावरुन समर्थनाच्या पोस्ट फिरू लागल्या आणि जाणीवपूर्वक बदनामीचे आरोपही समर्थकांनी केले. मात्र, या कालावधीत बीड भाजपने कुठलेही पत्रक वा आंदोलन केले नाही. 

आता मागच्या आठवड्यात सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही बलात्काराचा आरोप झाला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. मात्र, मुंडे यांनीच संबंधित महिलेच्या बहिणीसोबत संमतीने आपले संबंध होते आणि तिला त्यांच्यापासून दोन मुले असल्याचे जाहीरपणे सांगितले. अगदी मुलांना आपण स्वत:ची नावे दिली असून त्यांचा सांभाळही करत आहोत, त्यांना मुंबईत सदनिका दिल्याचे आणि तिच्या भावाला व्यवसाय उभारण्यासाठी मदत केल्याचे सांगून हा सर्व प्रकार खंडणी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे बलात्काराच्या आरोपापेक्षा त्यांच्या त्या दुसऱ्या महिलेची आणि त्या दोन मुलांची चर्चाच अधिक झाली. 

दरम्यान, बलात्कार करणाऱ्या महिलेवर इतरांनीही ब्लॅकमेल केल्याच्या आरोपांच्या तक्रारी केल्याने या प्रकरणाला काहीशी कलाटणी मिळाली आहे. यानंतर मुंडे समर्थक महिलेवरही चांगलेच संतापले आणि सोशल मीडियावर तिचा समाचार घेण्याबरोबच मुंडेंचे समर्थन केले.

अगदी आता मुंडेंच्या मुंबईच्या चित्रकुट निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठीही जिल्ह्यातील समर्थकांची गर्दी होत आहे. "लाख कोशिश करो मुझे गिरानेकी, मै जब जब बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. तरीही या कालावधीत बीड भाजप मात्र शांतच आहे. बीड भाजपला राष्ट्रवादीचा विरोध करायचा नाही की धनंजय मुंडे व महेबूब शेख यांच्यावरील आरोपच खोटे वाटतात, हेही कळाले नाही. पण, या कालावधीत केवळ एका महिला पदाधिकाऱ्याचे पत्रक निघाले तेवढी काय ती भाजपची प्रतिक्रिया राहिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com