BJP Aurangabad Party Workers in Confusion | Sarkarnama

बजाजनगर मंडळ शहर की ग्रामीण; भाजपा पदाधिकारी संभ्रमात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

भारतीय जनता पार्टी बजाजनगर मंडळ हे गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे. बजाजनगर मंडळ हे शहराशी निगडीत असून त्यानुसारच कार्य करते. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी भाजपाच्या वरिष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्हा भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक नवीन तालुका म्हणून औरंगाबाद पश्चिम तालुका करण्यात आला.

वाळूज : औरंगाबाद ग्रामीण जिल्हा भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक नवीन तालुका म्हणून औरंगाबाद पश्चिम करण्यात आला असून तालुका कार्यकारणीही घोषित केली. यात बजाजनगर मंडळाचा नामोल्लेख नाही. त्यामुळे बजाजनगर येथील भाजपा पदाधिकारी संभ्रमात पडले असून राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत.

भारतीय जनता पार्टी बजाजनगर मंडळ हे गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे. बजाजनगर मंडळ हे शहराशी निगडीत असून त्यानुसारच कार्य करते. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी भाजपाच्या वरिष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्हा भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक नवीन तालुका म्हणून औरंगाबाद पश्चिम तालुका करण्यात आला. एवढेच नव्हे तर जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी औरंगाबाद पश्चिम तालुका कार्यकारिणीही घोषित केली. यात बजाजनगर मंडळाचा उल्लेख नाही. त्यामुळे बजाजनगर भाजपा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात काम करावे की, ग्रामीणमध्ये, या संभ्रमात येथील कार्यकर्ते पडले आहेत. 

आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून बजाजनगर मंडळात काम करतो. आमचा ग्रामीणशी काहीही संपर्क नसतो. त्यामुळे बजाजनगर मंडळ हे शहराशिच निगडित असावे. अशी मागणीही भाजपा बजाजनगर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत केली. एवढेच नव्हे तर बजाजनगर मंडळाचा ग्रामीणमध्ये समावेश केला. तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी बजाजनगर मंडळ अध्यक्ष बाळासाहेब कार्ले, माजी अध्यक्ष प्रकाश चौधरी, शत्रुघन देशमुख, बजरंग पाटील, तुपकरी आप्पा, राजू अवतारे, गंगाधर नखाते यांची उपस्थिती होती.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख