Yashomati Thakur interacted with Kovid patients | Sarkarnama

पॉझिटिव्ह रूग्णांची 'या' पालकमंत्र्यांनी घेतली भेट...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

पालकमंत्र्यांनी  कोविड रूग्णालयाला भेट दिली. त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. 

अमरावती : अमरावती जिल्हाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज थेट जिल्हा कोविड रुग्णालयात एंट्री करीत रुग्णालयातील दाखल असलेल्या रूग्णांशी संवाद साधला. कोरोना रूग्णालयातील सध्याची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेतला. तेथील रुग्णांशी आस्थेने चौकशी केली. आजच्या या त्यांच्या भेटीमुळे कोविड वार्डात काम करणारे डॉक्टर, नर्स सफाई कामगार यांचे मनोबल तर वाढलेच या शिवाय रुग्णांनी पण पालकमंत्र्यांचे आभार मानले 

गेल्या काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आज प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी  सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांचे पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत. जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते.  आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवार करीत आहेत, असे यावेळी पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले. 

 

 
कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी येय़े उपचार घेत असलेल्या रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉ. रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करीत असल्याची माहिती रूग्णांनी दिली.  
यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती

 

 

 

ही बातमी वाचा : वारकऱ्यांकडून 'या' निर्णयांचे स्वागत... 

आळंदी : आषाढ शुद्ध दशमीलाच पालखी सोहळा हेलिकॉप्टर, बस अथवा पर्याप्त सोयीद्वारे मोजक्याच वारकरी प्रतिनिधींसह संतांच्या पादुका पंढरपूरला पोचणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे वारक-यांनी स्वागत केले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेली दक्षता आणि वारक-यांच्या विवेकाचे दर्शन घडले. 
 

माजी खासदार म्हणतात, 'पाईप जोडत होतो, बोला काय म्हणताय?"

संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत एकनाथ या प्रमुख चार पालख्यांनी जागेवरच प्रस्थान सोहळा पार पाडून पालखी आपापल्या गावात ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि थेट दशमीच्या दिवशी पंढरीत पोचायचा निर्णय घेतला. देहू, आळंदी देवस्थान हे दोन्ही देवस्थान मोठे आणि पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने वारक-यांबरोबरच  देवस्थान आणि सरकारपुढे मोठा पेच होता. मात्र, या दोन्ही पालख्या ज्या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जातात, त्याठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला. खुद्द पंढरपूरात कोरोनाचे रूग्ण आहे. मुंबईतही कोरोनाने कहर केला. यामुळे सरकारने पालखी सोहळ्यावर बंधने घातली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख