उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकूर यांचा आरोप 

त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही प्रस्ताव पाठविला आहे.
Yashmati Thakur, Ajit Pawar  .jpg
Yashmati Thakur, Ajit Pawar .jpg

अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आम्हाला पाहिजे तशी साथ देत नसल्याचा गंभीर आरोप महिला बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला. अकोल्यातील हॉटेल मराठा येथे आयोजित अन्याय ग्रस्त शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Yashmati Thakur criticizes Ajit Pawar) 

यावेळी बोलतांना ठाकूर म्हणाल्या, बालसंगोपन निधी अनुदानात कित्येक वर्षापासून वाढले नव्हते. बालसंगोपन निधीच्या माध्यमातून पूर्वी 450 रुपये मिळायचे. ते आम्ही 1 हजार 125 रुपये केले. आता हे अनुदान 2 हजार 500 रुपये करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठवला आहे. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, ते साथ देत नाहीत असा आरोप ठाकूर यांनी केला.   

या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करताना यशोमती ठाकूर यांनी अजित पवार सहकार्य करत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत या वक्तव्यामुळे बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या देशात जोपर्यंत परिवर्तन येत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला विभागण्याचे प्रयत्न होत राहतील. घर वापसीच्या नावाखाली हे होत आहे. आपण रामराम-सिताराम म्हणतो. एकीकडे देशात राम तेरी गंगा मेली हो गई, त्या गंगेत हरारोंची प्रेते वाहत होती. यातून हेच दिसते की केंद्र सरकार हिंदू विरोधी आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला.     

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com