बच्चू कडू यांचा युट्युब कडून गौरव; चॅनलला दिले सिल्व्हर प्ले बटन

युट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त या पत्राचा बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला.
  Bachchu Kadu .jpg
Bachchu Kadu .jpg

अकोला : राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या युट्यूब चॅनलला मंगळवारी (ता. १५ मार्च) युट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. युट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त या पत्राचा बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला.  (Silver play button on Bachchu Kadu YouTube channel)

बच्चू कडू आपल्या विविध आंदोलनामुळे नियमीत चर्चेत असतात. समाज माध्यमांमध्येही बच्चू कडू हे लोकप्रिय असून त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूब वर बच्चू कडू यांना एक लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. या शिवाय ट्विटरवर 2 लाख 51 हजार, फेसबुक 7 लाख 2 हजार व इंस्टाग्रामवर 3 लाख 20 हजार फॅालोअर्स आहेत. हे लोकांचे प्रेम आणि आपल्या बद्दल असलेला जिव्हाळा असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले, तर सोशल मीडियामध्ये आम्ही मागे नसून यासाठी अमीत वानखडे आणि टीम यांनी चांगली मेहनत घेतल्याचे त्यांनी म्हटले.  

यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या वक्तव्यवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. याला काही अर्थ नाही. हे राजकीय क्षेत्रात चालतच राहते याकडे लक्ष देऊन मनावर घेऊ नका.

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले पटोले यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना मी विधानसभेत अनेक वर्ष पाहिले आहे. त्या लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रणरागिणी आहेत. वेळ आली तर त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही पुढे मागे पाहत नाहीत,' असे पटोले म्हटले होते. यावर बच्चू कडू म्हणाले नाना पटोले कोणत्या अर्थाने म्हटले ते शोधावे लागेल, कारण मी ऐकले नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायची वेळच नाही. कारण हे आघाडीचे सरकार आहे. जर ही वेळ आलीच तर मग सरकार राहणार नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com