#unlock1 ; तहसीलदारांनी दुकाने केली 'सील'...   

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील मार्केटमध्ये मोठया प्रमाणात दुकानावर गर्दी होत आहे.
Unlock
Unlock

बुलढाणा  :   लॉकडाउनच्या काळात काही प्रमाणात शहरात शिथिलता मिळाली असल्याने शहरातील दुकाने हळूहळू उघडायला सुरवात झाली आहे. मात्र, बुलडाणा  जिल्ह्यातील मलकापूर शहरातील   मार्केटमध्ये मोठया प्रमाणात दुकानावर गर्दी होत आहे. त्यामुळे नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाने शहरातील नंदलाल केशवजी किराणा दुकान व मिलन ड्रेसेस या दोन्ही दुकानावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने यांना नोटीस देऊन दुकानाला 'सील'  लावण्यात आले आहे.


मलकापूर शहरात दिवसंदिवस  कोरोना आजाराचे रुग्ण  वाढत आहे.  सोशल डिस्टसिंगचा वापर करणे गरजेचे असताना शहरातील व्यवसायिकांनी सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर बसवित आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दुकानावर जास्त गर्दी करू नये, तोंडाला माक्स बांधावे, नियमाचे पालन न केल्यास दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन नायब तहसीलदार बाळासाहेब दराडे यांनी केले आहे.

हेही वाचा  :  कोकणला 1 हजार कोटीं द्या..


मुंबई  :  निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे.  रायगड, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग येथील शेती, घरे आणि मालमत्तेचे 5 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोकणासोबत पुणे नाशिक आणि पालघर याभागात ही निसर्ग चक्री वादळाचा फटका बसला आहे.  निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने किमान 1 हजार कोटींचा मदत निधी द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 


 कोकणात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे यांनी केवळ 200 कोटींची दिलेली मदत अत्यल्प आहे. किमान 1 हजार कोटींची मदत जाहीर करणे आवश्यक होते, असे  रामदास आठवले म्हणाले. पालघर, पुणे,  नाशिक, रायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत. कोकणात सिंधुदुर्ग, मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, रायगड येथे नुकसानाचे पंचनामे करावेत. काही ठिकाणी बेपत्ता नागरिकांचा तपास करावा.  वीजजोडणीचे काम युद्धपातळीवर करावे , कोकणात उखडलेले रस्ते उभारवेत आदी मागण्या रामदास आठवले यांनी केल्या  आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com