शेगाव बाजार समितीचे सभापती मिरगे यांचे सदस्यत्वपद रद्द ...

शेगाव बाजार समितीचे सभापती गोविंद मिरगे यांना अपात्र ठरविले असल्याचा निकाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांनी दिला आहे.
Market Committee.jpg
Market Committee.jpg

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद मिरगे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये बाजार समितीचा अनाठाई खर्च केलेला आहे. अनेक व्यवहारांमध्ये सरकारची परवानगी न घेता अधिकारात गैरउपयोग करून निर्णय घेतल्याने बाजार समितीचे नुकसान व अनियमितेचा ठपका ठेवून त्यांचे बाजार समितीमधील सदस्य आणि सभापतिपद अपात्र ठरविले असल्याचा निकाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांनी दिला आहे.  या आदेशामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

 
शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी प्रणित परिवर्तन गटाचे वर्चस्व आहे.  मात्र, सभापती गोविंद मिरगे यांनी आपल्या कार्यकाळातमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय बाजार समितीचे सचिव व व्यापार्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम 2017 चे 10 नुसार  नुकसान केल्याच्या तक्रारी जिल्हा निबंधक यांच्याकडे मागील दोन वर्षापासून करण्यात आलेल्या होत्या. 

यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा उपनिबंधक डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकार, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई अधिसुचना दि.१२ फेब्रुवारी, २०२० मधील तरतुदीनुसार सभापती गोविंद मिरगे यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, शेगांवचे सभापती यांनी व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीच्या निवडणुका) नियम २०१७ चे नियम १० (१) (फ), नियम १० (१) (आय) व नियम १० (३) नुसार अपात्र ठरवून समितीच्या सदस्य पदावरुन कमी करण्याचे आदेश दिले . 
Edited by : Mangesh Mahale

 
हेही वाचा :एरव्ही भांडणाऱ्या 'मैत्रिणीं'चा दिसून आला जिव्हाळा
 
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि दुसऱ्या विद्यमान अध्यक्षा यांच्यातला जिव्हाळा समोर आला आहे. एरव्ही ट्वीटरवरुन भांडणाऱ्या या दोघी मैत्रिणींपैकी एकजण आजारी पडल्यानंतर दुसऱ्या मैत्रिणीने ट्वीट करुन आपली राजकारणापलीकडची मैत्री दाखवून दिली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, हे पुन्हा एकदा यामुळे अधोरेखित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना माजी प्रदेशाध्यक्षा व आताच्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. मध्यंतरी दोघींमधले ट्वीटर वाॅर चांगलेच गाजले होते. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com