सातशे कर्मचाऱ्यांचे इतक्या कोटीचे वेतन थकले...

आरोग्य विभागातील 700 कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन अद्याप रखडले आहेत. वेतन नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी संतप्त झाले आहेत.
Corona Fear.
Corona Fear.

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. या गंभीर संकटातही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 700 कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन अद्याप रखडले आहेत. वेतन नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी संतप्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

याबाबत जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे. येत्या ७ दिवसात वेतन न दिल्यास कामबंद आंदोलन करणार आहेत. कोरोनाशी मुकाबला करीत असताना गेल्या तीन महिन्यापासून  जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. आरोग्य सेवक, पर्यवेक्षिका, नर्सेस, डॉक्टर यांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे वेतनाचा मुद्दा निकाली काढण्यात यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. 

जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ७०० आहे. महिन्याकाठी अडीच कोटी रुपयांचे वेतन त्यांना जवळपास द्यावे लागते. एकीकडे अन्य अधिकाऱ्यांचे वेतन झाले आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन जून महिन्याचा पंधरवाडा आटोपल्यानंतरही मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही भुमिका घेतली असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोखंडे यांनी दिली

हेही वाचा : जळगावचे नवे जिल्हाधिकारी  अभिजित राऊत 


जळगाव :  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनातील अपयशी ठरलेले जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे  यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सांगली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग रोखण्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये डॉ.  ढाकणे कमी पडल्याची भावना जनमानसात निर्माण झाली होती. त्यातच गेल्या बुधवारी (ता. 10) कोविड रुग्णालयातील शौचालयात कोरोना बाधित वृद्धेचा मृतदेह आढळल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण देशभरात गाजले.  शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह तीन डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com