या जिल्ह्यात राष्ट्रवादीलाही प्रतिनिधित्व, काँग्रेस, वंचितची पाटी कोरीच

विधानसभेसोबतच विधान परिषदेतही अकोल्याचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी हे अष्टमंडळ किती निधी खेचून आणते याकडे जिल्हा मोठा अपेक्षेने बघत आहे.
amol_20mitkari
amol_20mitkari

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने अकोला जिल्ह्याला आठवे आमदार मिळाले आहे. त्यानंतरही काँग्रेस आणि वंचित  बहुजन आघाडीची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.

अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासह विधान परिषदेचे तीन आमदार असे एकूण आठ आमदार जिल्ह्याला मिळाले आहेत. य़ाशिवाय शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे हेहीसुद्धा अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांचे निवास स्थान अमरावती जिल्ह्यात आहे. मतदारसंघ हा अमरावती विभाग असल्याने अकोल्यातील त्यांचा संपर्क केवळ बैठकांपुरताच मर्यादित असतो.

जिल्ह्यात भाजपचे चार विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर, अकोला पश्चिममधून सहाव्यांदा निवडून आलेले गोवर्धन शर्मा, तिसऱ्यांना निवडून आलेले मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे आणि अकोटमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रकाश भारसाकळे हे चार आमदार भाजपचे आहेत. शिवसेनेने बाळापूरमध्ये नितीन देशमुख यांच्या रुपाने दहा वर्षांनंतर जिल्ह्यात खाते उघडले होते. 

विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि विभागीय पदविधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे भाजपचे डॉ. रणजित पाटील हेसुद्धा अकोला जिल्ह्यातील निवासी आमदार आहेत. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी या जिल्ह्यात कोरी होती.

त्यात यावेळी भारिप-बमसं अर्थात वंचित बहुजन आघाडीचीही भर पडली होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने अकोटचे युवा नेते अमोल मिटकर यांना उमेदवारी दिली. ते जिल्ह्यातील आठवे आमदार ठरले आहेत. त्यामुळे विधिमंडळात अकोल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले. काँग्रेस आणि वंचितची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.

असाही योगायोग

अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे हे दुसऱ्यांदा अकोला जिल्ह्यातून आमदार झाले आहेत. मात्र, त्यांचे निवास स्थान आजही दर्यापूर येथे आहे. तर अकोला जिल्ह्यातील रहिवासी विप्लव गोपीकिशन बाजोरिया हे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र ते हिंगोली-परभणी विधान परिषद मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मूळ निवासी असलेल्या आमदारांची संख्याही आठ कायम आहे.

अष्टमंडळाकडून जिल्ह्याला अपेक्षा

अकोला जिल्ह्यातील आठ आमदार हे जिल्ह्याचे अष्टमंडळ ठरले आहे. विधानसभेसोबतच विधान परिषदेतही अकोल्याचा टक्का वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्न विधिमंडळात मांडून या जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी हे अष्टमंडळ किती निधी खेचून आणते याकडे संपूर्ण जिल्हा मोठा अपेक्षेने बघत आहे. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com