पिक विम्याच्या रक्कमेसाठी शेतक-यांचे आंदोलन सुरू...

बँकानी जिल्ह्यातील एकाही शेतक-यांचे पिक विम्याचे पैसे न थांबवता शेतक-यांना वाटप करा, अन्यथा बँक अधिका-यांना झोडपून काढू असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.
Crop Insurance (2)
Crop Insurance (2)

बुलढाणा :कर्ज खात्यात जमा केलेली पिक विम्याची रक्कम शेतक-यांना मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष प्रशांत दिक्कर यांच्या नेतृत्वात संग्रामपुरात आंदोलन सुरू आहे.  यावेळी  बॅंकेच्या गेटजवळ आंदोलन शेतकरी जमले होते.   

जोपर्यंत पिक कर्जाची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत बँक अधिका-यांना बॅंक बाहेर जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलन कर्त्यानी घेतली आहे.   विविध मागण्यांचे निवेदन बॅंक अधिकाऱ्यांना देण्यात आले.  

यामध्ये शेतक-यांच्या पिक विम्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा, बँकानी जिल्ह्यातील एकाही शेतक-यांचे पिक विम्याचे पैसे न थांबवता शेतक-यांना वाटप करा, अन्यथा बँक अधिका-यांना झोडपून काढू असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.  


हेही वाचा :  जवळचा मार्ग ठरला पत्नी, दोन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत... 

उरुळी कांचन :  रस्त्यालगतच्या विहीरीत कार पडल्याने, यातील पस्तीस वर्षीय महिलेसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यु झाला. पुणे - सोलापूर रस्त्यावर अष्टापुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगळवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.  शितल सचिन कोतवाल (वय ३५ वर्षे), मुलगी सृष्ट्री (वय ९ ) व शौय (वय ६ ) या मायलेकांचा पाण्यात बुडुन जागीच मृत्यु झाला. शितलचे पती, सचिन श्रीहरी कोतवाल (वय ४२ वर्षे) हे मात्र प्रसंगसावधतेमुळे बचावले. प्रसंगावधानता दाखवत संबधित ते गाडीबाहेर पडल्याने ते वाचले.  यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांच्या शितल या सूनबाई आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सचिन व शितल हे आपल्या दोन मुलासह, शितल यांच्या माहेरी राहु (ता. दौड) येथे मंगळवारी दुपारी कामानिमित्त गेले होते.  मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहु येथून अष्टापुर येथे कारमधून परत येत होते. कोसनंद-राहु रस्त्यावरुन अष्टापुर गावात जाण्यासाठी मुख्यमार्गाऐवजी सचिन यांनी, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळून जाणारा जवळचा मार्ग पत्करला. हा हाच मार्ग शितल व तिच्या मुलांच्या मृत्युस काऱणीभूच ठरला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com