फडणवीस हे ज्योतिषी, त्यामुळे तेच सांगतील ठाकरे सरकार कधी पडेल ते ? प्रकाश आंबेडकरांचा टोला 

चीन सैनिक दोन किलोमीटर मागे गेले पण, ते किती कि.मी.आत आले होते, याची माहिती सरकाराने द्यावी. कोरोना सकंट काळातील भ्रष्टाचार अद्याप बाहेर निघाला नाही. तो पुढे बाहेर निघेल असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
फडणवीस हे ज्योतिषी, त्यामुळे तेच सांगतील ठाकरे सरकार कधी पडेल ते ? प्रकाश आंबेडकरांचा टोला 

अकोला ः देवेंद्र फडणवीस हे ज्योतिषी आहेत, मी नाही. त्यामुळे राज्यातील सरकार पडणार की, पडणार नाही, हे तेच सांगू शकतील, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. 

केंद्र व राज्यातील सत्ताधारी हे आरक्षण विरोधी असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे ओबीसीच्या अकरा हजार विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील सरकार पडणार की नाही पडणार हे फडणवीसच सांगू शकतील. ते ज्योतिषी आहेत, मी नाही असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले,"" या विषयी त्यांनी प्रत्येक आमदाराला पुन्हा निवडणूक नको आहे, त्यामुळे हे सरकार पडणार नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे कायद्यानुसार काम करत असून, त्यांच्या या कार्यशैलीमुळेच 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा तुर्तास थांबला आहे. राज्यभवन हे घटनात्मक केंद्र आहे. राज्यपाल हे कायद्याला धरून काम करत असल्याने राजकीय पक्षांना पेच निर्माण झाला आहे.' 

ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वंचित 
केंद्र सरकारने ओबीसीसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. 2017 पासून ते आजपर्यंत या धोरणामुळे अकरा हजार ओबीसीचे विद्यार्थथी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणा अभावी वंचित राहिले आहेत.

मोदी सरकारच्या चुकीच्या आरक्षण धोरणाचा फटका ओबीसींना बसल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. देश पातळीवरील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अदर बॅकवर्ड क्‍लासेसनी ही आकडेवारी जाहीर केली असून, नीट या प्रवेशामध्ये ओबीसीला कायद्यानुसार आवश्‍यक असलेले 27 टक्के आरक्षण न दिल्यामुळे आज ओबीसीचे 11 हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.'' 

वस्तुतः भारतीय राज्यघटनेच्या 93 व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणे आवश्‍यक आहे. परंतु ऑल इंडिया हा नॅशनल इंटलजीबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी.) मार्फत भरल्या जात असून, केंद्र शासनाने सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसीला आवश्‍यक असणारे आरक्षण सन 2017 पासून कमी केले आहे .

 त्याचाच फटका ओबीसींना बसला आहे. परंतु केंद्र सरकारने नीटला हाताशी धरून कट ऑफ मध्ये बदल घडवून ओबीसीचे आरक्षण संपण्याचा डाव रचला आहे असा आरोपही त्यांनी केला. 

शैक्षणिक सत्र 2017-18, 2019-20 या शैक्षिणक क्षेत्रामध्ये ओबीसीला आरक्षणाचा फटका बसला आहे. ओबीसींना हक्क असणारे आरक्षण मिळेपर्यंत वंचित बहूजन आघाडी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आजच्या पत्रकार परिेषदेवेळी प्रा.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, डॉ. प्रसन्नजीत गवई उपस्थित होते. 




 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com