कोरोनामुळे दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीतील प्रवेशही लॉक

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी जानेवारीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता.
कोरोनामुळे दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीतील प्रवेशही लॉक

अकोला : वंचित बहूजन आघाडीतून बाहेर पडलेले अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदार नवीन पक्षाच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक साधली असली तरी त्यांचा पक्ष प्रवेश कोरोनामुळे सध्या तरी लॉक झाला आहे.

पक्षांतर्गत मतभेदातून हे राजीनामानाट्य घडल्यानंतर दोन्ही आमदारांच्या नवीन पक्षाबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भदे आणि सिरस्कार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एका कार्यक्रमात मंचावर हजेरी लावली. 

त्यात बारा बलुतेदारांच्या प्रश्नांबाबत आणि त्यांना विश्वासात घेवून पक्षात प्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यानंतर मात्र कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण देशभर लॉकडाउन झाले. राजकीय पक्षांच्या घडामोडीही थंडावल्यात. सर्व यंत्रणांसह राजकीय पक्षही गरजूंना मदत करण्यात गुंतल्यात. त्यामुळे दोन्ही आमदारांचा पक्ष प्रवेशही लांबवणीवर पडला. त्याची चर्चाही थांबली.

नव्या राजकीय समिकरणाची प्रतीक्षा
अकोला जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या दोन माजी आमदारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा थांबली आहे. यादरम्यानच्या काळात राजकीय क्षेत्रात बरेच बदल घडून आले. येणाऱ्या काळात त्यात आणखी नवीन विचारांची भर पडणार आहे.

अशावेळी दोन्ही माजी आमदारांना राष्ट्रवादी प्रवेश मिळणार की नाही, याबाबतही आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरवात झाली आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या राजकीय घडामोडीमध्ये दोन्ही आमदारांना नवीन पक्ष शोधण्यासाठी नव्या राजकीय समिकरणांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


महानगरपालिका निवडणूक असेल केंद्र स्थानी
अकोला महानगरपालिका निवडणूक फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये होईल. त्यापूर्वी राजकीय पक्षांकडे वर्षभराचा काळ राहणार आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय आणि सामाजिक समिकरणांवर लक्ष केंद्रीत करीत दोन्ही माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाला महत्त्व येणार आहे. भदे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात कर सिरस्कार माळी समाजाचे. 

अकोला शहरात या दोन्ही समाजाचे मतदार हे काही प्रभागांमध्ये निर्णायक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही माजी आमदारांना आपल्या गोटात घेवून त्याचा राजकीय फायदा करून घेऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com