...तर मग सरकार राहणार नाही 

उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचे आहे.
 Bachchu Kadu .jpg
Bachchu Kadu .jpg

अकोला : उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. याला काही अर्थ नाही. हे राजकीय क्षेत्रात चालतच राहते याकडे लक्ष देऊन मनावर घेऊ नका, असे सांगत राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole Congress) यांना टोला लगावला. (Bachchu Kadu has reacted to Nana Patole statement)

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले पटोले यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना मी विधानसभेत अनेक वर्ष पाहिले आहे. त्या लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रणरागिणी आहेत. वेळ आली तर त्या मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही पुढे मागे पाहत नाहीत,' असे पटोले म्हटले होते. यावर बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले नाना पटोले कोणत्या अर्थाने म्हटले ते शोधावे लागेल कारण मी ऐकले नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायची वेळच नाही. कारण हे आघाडीचे सरकार आहे. जर ही वेळ आलीच तर मग सरकार राहणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.  

नाना पटोले काय म्हणाले होते. 

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी आणि येत्या काळातील निवडणुका व मुख्यमंत्रिपदाबाबत रोखठोक भाष्य केले होते.  ते विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. तसेच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हणाले होते. इतकेच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असेही त्यांनी बोलून दाखवले होते. नंतर पटोले यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. 

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे. त्यांना उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोणाला मुख्यमंत्री करायचे ते. दरम्यान, नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले म्हणाले पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com