सचिन वाझेंचे बंधू सुधर्म उच्च न्यायालयात... माझा भाऊ तर..! - Sudharm Waje moves to high court to demad bail for brother Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेंचे बंधू सुधर्म उच्च न्यायालयात... माझा भाऊ तर..!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

उच्च न्यायालय सचिन वाझेंच्या पोलिस कोठडीला स्थगिती देणार का? 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन भरून ठेवलेल्या वाहनप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासमोरील अडचणी वाढतच आहे. मुंबई पोलिस दलातून त्यांनी निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी काल दिल्यानंतर वाझे यांचे बंधू सुधर्म यांनी आता उच्च न्यायालयात दाव घेतली आहे.

``एनआयए`ने माझा भाऊ सचिनला बेकायदा ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे सचिनला हायकोर्टात हजर करण्याचा आदेश द्यावा,`` अशी हेबियस कॉर्पस याचिकेत विनंती केली आहे. ‘दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझेला बळीचा बकरा बनवला आहे. पुरावे नसतानाही त्याला अँटिलिया प्रकरणात गोवले’,’, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

दुसरीकडे या प्रकरणावरून राजकीय चर्चाही जोरात सुरू झाली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय वरूण सरदेसाई यांच्यावर आरोप केले. सरदेसाई आणि वाझे यांचे व्हाॅटस अप चॅट आणि टेलिग्राम मेसेज हे तपासले जावेत, अशी मागणी राणे यांनी केली. 

शंभूराज देसाई काय म्हणाले?

कऱ्हाड :  महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे. सचिन वाझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवुन त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शभूराज देसाई व्यक्त करुन केंद्राच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली.

कऱ्हाड येथे ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, ``विधानसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व सदस्यांनी आग्रही मागणी केली, तेव्हा या तपास कामांमधून वझे यांना बाजूला करून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिस योग्य दिशेने तपास करत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकार दोषी असणाऱ्या कुणालाही पाठिशी घालणार नाही. महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे. सचिन वाझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवुन त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही.``

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख