मी गडचिरोलीतील जबाबदारी स्वतःहून मागितली : IPS संदीप पाटील - I asked for responsibility in Gadchiroli myself says IPS Sandeep Patil | Politics Marathi News - Sarkarnama

मी गडचिरोलीतील जबाबदारी स्वतःहून मागितली : IPS संदीप पाटील

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

पुण्यात चांगले काम करूनही गडचिरोलीत बदली झाल्याने अनेकजण चकीत झाले होते. 

पुणे : मला गडचिरोलीत पाठविले नसून मी स्वतःहून तेथे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार माझी तेथे बदली झाली आहे, असे स्पष्टीकरण पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

राज्य सरकारने काल अतिरिक्त पोलिस महासंचालक, महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक दर्जाच्या 36 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात संदीप पाटील यांना उपमहानिरीक्षकपदी बढती देऊन गडचिरोलीत पाठविण्यात आले. पाटील यांनी पुण्यात चांगले काम करूनही त्यांची गडचिरोलीत बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले की पुण्यातील कामगिरीबाबत मी समाधानी आहे. कोरेगाव भीमाची दंगलीची घटना 2018 मध्ये घडल्यानंतर दुसऱ्या वर्षी तेथे योग्य बंदोबस्तात विजयदिन साजरा झाला. त्यात पोलिसांचे मोठे कौशल्य पणाला लागले होते. एमआयडीसीतील गुंडगिरी संपविण्यासाठी प्रयत्न केले. सामान्य माणसाला पोलिस ठाण्यात न्याय मिळेल, या दृष्टीने विविध पावले उचलली. पोलिस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. पुणे जिल्ह्यातील पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी चांगले काम करण्याचा सुरवातीपासून प्रयत्न केला.

#Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #maharashtra #424policemen #Infected #Corona #SingleDay

Posted by Sarkarnama on Thursday, September 3, 2020

मी गडचिरोलीला पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. त्यामुळे तेथील कामाचा अनुभव आहे. तेथे काम करण्यासाठी अनेक चांगल्या योजना सुरू केलेल्या होत्या. त्यासाठी आता आणखी वेळ देता येईल. तेथे काम करण्यासाठी मी इच्छुक होतो. दिलेली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. तेथेही तसेच करेन. त्यामुळे मला पाठविण्यात आले नसून मी स्वतः हून तेथे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख