मुख्य सचिवांनी मराठीला डावलले; शिवसेनेने मराठीचा गजर कृतीतून दाखवावा 

माय मराठीच्या सन्मानासाठी लढा सुरू असतानाच दुसरीकडे प्रशासनातील अधिकारीच मराठीला डावलत असल्याचे समोर आले आहे.
Violation of Marathi Promotion Policy by Chief Secretary: MLA Vinod Nikole
Violation of Marathi Promotion Policy by Chief Secretary: MLA Vinod Nikole

विरार : माय मराठीच्या सन्मानासाठी लढा सुरू असतानाच दुसरीकडे प्रशासनातील अधिकारीच मराठीला डावलत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक 4 चे आदेश इंग्रजी भाषेत काढून मराठीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचे मुख्य सचिवांकडूनच उल्लंघन झाल्याचे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी इमेलद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेने मराठीचा गजर कृतीतून दाखवावा, उपरोधिक टोला लगावला आहे. 

आमदार निकोले म्हणाले की, कोविड-19 या विषाणूच्या साथीशी आपण सर्वजण लढत आहोत. अशातच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी 31 ऑगस्ट रोजी अनलॉक-4 संदर्भात काढलेले आदेश पूर्णतः इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळे सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या सरकारी परिपत्रकांतील नियमाचे उल्लंघन झाले आहे. भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. 

एकीकडे राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य करून मराठी भाषा न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढते. मराठी भाषा प्रभावीपणे वापरली जावी; म्हणून नुकतीच "महाराष्ट्र राजभाषा अधिनियम समिती' स्थापन केली आहे. पण, कामकाजात मराठीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचे मुख्य सचिवांकडूनच उल्लंघन होताना आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवली जाईल का हा मुख्य प्रश्न आहे. 

त्या अनुषंगाने सरकारच्या निर्णयांचे तसेच परिपत्रकांचे व आदेशांचे काटेकोरपणाने पालन व्हावे, अशी मागणीही निकोले यांनी केली आहे. या मागणीला माकप जिल्हा कमिटी सदस्य चंद्रकांत गोरखाना, डहाणू शहर सचिव धनेश अक्रे, रशीद पेंटर, महेंद्र दवणे आदी पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. 

मराठीचा पुरस्कार करण्याऱ्या शिवसेनेने सत्तेत असताना ते कृतीतून दाखवून देणे गरजेचे आहे. यापूर्वी सत्ता नसताना मराठीच्या नावाने गळे काढणाऱ्यांनी आता सत्ता आल्यावर मराठीची गळचेपी थांबवावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून माय मराठीला सन्मान प्राप्त करून द्यावा, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : सोलापूरचे जिल्हाधिकारी महाराष्ट्रात भारी 

सोलापूर : उन्हाळ्यात सर्वाधिक टॅंकर लागणारा जिल्हा; पण देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणूनही सोलापूरची ओळख आहे. आता सोलापूर पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर आले आहे. 

जलयुक्त शिवार, वॉटरकप स्पर्धा यासह लोकसहभागातून टंचाई मुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्याने राबविलेल्या योजनांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशातील उत्कृष्ठ जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री (नाविन्यपूर्ण) पुरस्काराचे सादरीकरण करण्यासाठी देशातील 12 जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

जलसंधारणाच्या कामाबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा या 12 अधिकाऱ्यांमध्ये समावेश असून महाराष्ट्रातून निवड झालेले ते एकमेव अधिकारी आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी महाराष्ट्रात भारी ठरले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com