भाजप खासदारास उद्धव ठाकरे म्हणाले, 'संपर्कात राहा; कधीतरी उपयोग होईल' 

आपण कायम शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही पाटील म्हणाले.
Uddhav Thackeray advises BJP MP to stay in touch
Uddhav Thackeray advises BJP MP to stay in touch

कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना ठाणे महापालिका रुग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्याला नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची नेहमीच मदत झाली, असे भारतीय जनता पक्षाचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी भाषणात सांगितले. 

आपण कायम शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही पाटील म्हणाले. त्यावर "आपण संपर्कात आहात, तसेच राहा. कधी तरी उपयोगात येईल,' असे हसत हसत म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार पाटील यांना एकप्रकारे शिवसेनेच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला. 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लाल चौकी परिसरात कोव्हिड समर्पित रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी नेत्यांमधील शाब्दीक आतषबाजी पाहायला मिळाली. 

कल्याण डोंविलीच्या महापौर विनिता राणे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना ते पेशाने डॉक्‍टर असल्याने अधिक मदत झाल्याचे सांगितले. त्यावर भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी, "डॉक्‍टर अधिक मदत करतात, हे माहीत असते तर एमबीबीएस होऊन लोकप्रतिनिधी झालो असतो' असे मिश्‍कील उत्तर दिले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या भाषणात महापौर राणे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. "पेशाने डॉक्‍टर असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये अधिक फायदा झाला' असा महापौरांच्या बोलण्याचा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

या सर्व शाब्दीक बाणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडी केली. "मी डॉक्‍टर नाही, मात्र वेळ पडल्यावर इंजेक्‍शनही देतो' असे खुसखुशीत भाष्य करत या राजकीय जुगलबंदीला एक वेगळाच तडका दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com