महाआघाडीला कॉंग्रेसच्या, तर सहकार पॅनेलला भाजपच्या नाराजीचा फटका बसणार? 

कोण कोणाच्या बाजूने आहे, हे लवकरच कळेल असा सूचक इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.
Polling for Thane District Central Co-operative Bank will be held on March 30
Polling for Thane District Central Co-operative Bank will be held on March 30

ठाणे : सहकार क्षेत्रामध्ये सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासाठी उद्या (मंगळवारी, ता. 30 मार्च) मतदान होणार आहे. सहकार पॅनेलविरोधात महाविकास आघाडी परिवर्तन पॅनेल अशी थेट निवडणूक होणार आहे. 

या अगोदर सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आता 15 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण 18 केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून या वेळी सुमारे तीन हजार 62 मतदार हक्क बजावणार आहे. 

कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होणार असल्याने एका केंद्रावर केवळ 300 मतदारांनाच परवानगी देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 110 निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. 

धुळवडीच्या दुसऱ्याच दिवशी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. बॅंकेवर बहुजन विकास आघाडीप्रणित सहकार पॅनेलच्या (या पॅनेलमध्ये भाजपचा समावेश आहे) संचालक मंडळाचे वर्चस्व आहे. त्याला टक्कर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाविकास आघाडीप्रणित परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे. सहकार पॅनेलला शिट्टी; तर परिवर्तन पॅनेलला कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. बविआने भाजपला या निवडणुकीत गुंडाळल्याची चर्चा आहे; तर महाविकास आघाडीने कॉंग्रेसला कमी जागा दिल्याने थोडा नाराजीचा सूर होता. त्यामुळे या मतभेदाचा परिणाम मतदानावर किती होतो, हे पाहणे गरजेचे आहे. 

दरम्यान, निवडून आलेल्या सहा उमेदवारांपैकी पाच जण आपल्या पॅनेलचे असल्याचे बविआने जाहीर केले आहे. कोण कोणाच्या बाजूने आहे, हे लवकरच कळेल असा सूचक इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. त्यामुळे 31 मार्चला मतमोजणीनंतर विजयाचा टिळा कुणाच्या कपाळी लागतो आणि कोण विजयाच्या गुलालाची उधळण करणार? याचे चित्र बुधवारीच स्पष्ट होणार आहे. 

दिग्गज रिंगणात 

जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी अनेक राजकीय दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीने ठाणे पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार, जगन्नाथ चौधरी, पंडित पाटील, नीलेश सांबरे, विशाखा खताळ, अनिल शिंदे, शोभा म्हात्रे आदी उमेदवारांना संधी दिली आहे; तर सहकार पॅनेलने प्रशांत पाटील, अरुण पाटील, उल्हास बांगर, वासुदेव पाटील, इंद्रजित पडवळ, लक्ष्मण डोंबरे, शिवाजीराव शिंदे, नीता कांबळी, राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com