एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्याला अटक - Offensive post against Eknath Shinde; Mayuresh Kotkar arrested | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्याला अटक

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 जून 2021

शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Offensive post against Eknath Shinde; Mayuresh Kotkar arrested)   

भाजप अस्वस्थ; गणेश गितेंसह शहाणे संजय राऊतांच्या दरबारी

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार करुन आंदोलन केले होते. त्या आंदोलनामध्ये मयुरेश यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या नंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. या मागणीवरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला यापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले होते, त्यात वाद नको, असे म्हटले होते.

खडसे, राजू शेट्टींचे नाव कुठयं...याचा फैसला होणार

दि. बा. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे हे महान नेते आहे. नावावरुन वाद न होता आता विमानतळाला नाव देण्याचे ठरले आहे. दि. बा. पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख