मनसेचे आंदोलन अवघ्या पाच मिनिटांत आटोपले 

कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.
The MNS agitation came to an end in just five minutes
The MNS agitation came to an end in just five minutes

ठाणे : महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 1 ऑक्‍टोबर) डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांत केक कापून वर्धापन दिन साजरा केला. पण, या आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील मनसेचा एकही नगरसेवक उपस्थित राहिला नाही. मनसेचे कार्यकर्तेही बोटावर मोजण्याइतपतच असल्याने अवघ्या पाच मिनिटांत हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी गुंडाळले. 

कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरीक जखमी झाल्याच्या घटना दरवर्षी घडतात. सत्ताधारी पक्ष या समस्यांकडे गांभीर्याने पहात नाही, तसेच विरोधी पक्षही केवळ आंदोलन, स्टंटबाजी करून नंतर गप्प बसत असल्याने नागरिकांनीही आता त्याकडे लक्ष देणे सोडून दिले आहे आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गुरुवारी 37 वा वर्धापनदिन होता. या दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. टिळक रोडवरील खड्ड्यांत पालिका इमारतीची प्रतिकृती आणि केक कापून मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या उदासिन कारभाराचा निषेध व्यक्त केला. 

यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत, सुदेश चुडनाईक यांसह काही मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. गेली दिड दोन महिो डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था बिकट असून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सातत्याने आवाज उठविला जात आहे.

पाऊस असल्याने त्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी कामांनी गती पकडलेली नाही. ज्या ठिकाणची कामे होत आहेत, तेथे कामात थुकपट्टी लावली जात आहे. दरवर्षी खड्ड्यांचा मोसम शहरात येतो, 37 वर्षांचा विकासाचा प्रवाह हा उलटा वाहत असून कल्याण डोंबिवली नाही तर खड्ड्यांण डोंबिवली महानगरपालिका आहे, त्यामुळे आज खड्ड्यात केक कापून हा वर्धापनदिन साजरा केल्याचे या वेळी राजेश कदम यांनी सांगितले. 

मनसे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून लक्ष केंद्रीत करीत आहे. परंतू आंदोलनावेळी त्यांची एकजूट कमी पडत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. गुरुवारीही डोंबिवलीत करण्यात आलेल्या आंदोलनाला मनसेचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.

डोंबिवलीत मनसेचे चार लोकप्रतिनिधी आहे, परंतु त्यातील एकही लोकप्रतिनिधी आंदोलनाला उपस्थित नव्हते. मोजकेच कार्यकर्ते असल्याने अवघ्या पाच सहा मिनिटांतच पदाधिकाऱ्यांना हे आंदोलन आटोपते घ्यायला लागले. काही मिनिटांच्या या खेळामुळे रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधण्यासही मनसे कमी पडल्याचे दिसून आले. 

मनसे कार्यकर्ता खड्ड्यात पडून जखमी 

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक जखमी होण्याच्या घटना शहरात घडत असतात. मनसेचे डोंबिवली शहर संघटक प्रशांत पोमेंडकर हे महापालिकेच्या डोंबिवली उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावरील खड्ड्यांत दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी त्यांचा अपघात झाला असून त्यांच्या पायाला दहा टाके पडले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com