आमचे आमदार हरवले आहेत हो....! 

ते सध्या गायब झाले आहेत.
MLA Pratap Sarnaik has Missing, a poster campaign in Thane
MLA Pratap Sarnaik has Missing, a poster campaign in Thane

ठाणे : टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या (सक्तवसुली संचलनालय) हिटलिस्टवर असलेले शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या काही महिन्यांपासून कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत. ते सध्या गायब झाले आहेत. त्यावरून सरनाईक यांच्याविरोधात ठाण्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ तीन महिने झाले हो, आमचे आमदार होते ते, कुठे गेले सध्या ते, झाले गायब हो ते, असे लिहिलेले फलक सध्या ठाणे परिसरात दिसून येत आहेत. (MLA Pratap Sarnaik has Missing, a poster campaign in Thane)
 
टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर तसेच कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. त्यावेळी ईडीने सरनाईक यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावरून राज्यात मोठा गदरोळ झाला होता. अन्वय नाईक आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत लावून धरल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून जाणून बुजून अशी कारवाई केली जात आहे, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यावरून दोन पक्षांत आरोप-प्रत्यारोप रंगले होते. 

दरम्यान, ईडी आणि सीबीआयकडून महिनाभरापूर्वी प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर संयुक्तपणे छापेमारी केली होती. एकंदरीतच ईडी आणि सीबीआयकडून प्रताप सरनाईक यांच्या मागे सध्या कारवाईचा मोठा ससेमिरा लागलेला आहे. ईडीची चौकशी सुरू झाल्यापासून प्रताप सरनाईक हे मात्र गायब झाले आहेत. एरवी कोणत्याही मुद्यावर आक्रमक पवित्रा घेणारे सध्या कुठे आहेत, असा प्रश्न सध्या सर्वांना पडलेले आहे. 

या सर्व प्रकरामुळे त्यांच्या ठाण्यातील मदारसंघात त्यांच्याविरोधात सध्या पोस्टरबाजी सुरू झाली आहे. ‘तीन महिने झाले हो....आमचे आमदार होते ते....कुठे गेले सध्या ते.... झाले गायब हो ते...,’ ‘ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर....आमदार कागदावर’, ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ अशा आशयाची पोस्टरबाजी ठाणे परिसरात दिसून येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com