सुशांतसिंह प्रकरणी मुंबई पोलीसांकडून चांगला तपास : एकनाथ शिंदे  - Good investigation by Mumbai Police in Sushant Singh case: Eknath Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरणी मुंबई पोलीसांकडून चांगला तपास : एकनाथ शिंदे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

वाढीव वीज बिलाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव येईल.

मुंबई : सुशांतसिंह राजपूतप्रकरणी मुंबईल पोलीस चांगला तपास करीत आहेत. तसेच कोणताही ठोस पुरावा नसताना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

मराठा क्रांती मोर्चा आंदोलन ज्यांचे मृत्यू झाले होते त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता 
आज याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

वाढीव वीज बिलाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव येईल. लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 व्यक्तींच्या नातेवाईकांस एसटी महामंडळात नोकरी देण्याबरोबरच 10 लाख रोख मदत देणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 
- सन 2019-20 या शैक्षणिक वर्षी एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणाच्या परिणामी बाधीत झालेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाचे भरणा केलेल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती शासनामार्फत करण्याचा निर्णय. 
- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय. 
- मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय . म्हाडा अधिनियम मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. 
- महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या कायम मर्यादेत तात्पुरती वाढ करण्याकरिता अधिनियमात दुरुस्ती करण्यास मान्यता. 
- अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख