योगींना 50 लाख देतो, त्यांनी खुर्ची सोडावी : पीडित मुलीच्या काकाची संतप्त प्रतिक्रिया 

हाथसरला जाण्यासाठी तिकीट न मिळाल्याने ते गावी जाऊ शकले नाहीत.
Gives Rs 50 lakh to Yogi, he should leave the CM Post : Angry reaction of victim's uncle
Gives Rs 50 lakh to Yogi, he should leave the CM Post : Angry reaction of victim's uncle

उल्हास नगर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 50 लाख रुपये देतो, त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया हाथसर येथील सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या मोठ्या काकांनी दिली आहे. 

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, त्यावर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगर शहरात राहणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीने उल्हास नगर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या वेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 

आमच्या मुलींवर बलात्कार करून हत्या केली, तिला अग्नी देण्याचा अधिकार पण पोलिसांनी हिरावून घेतला. त्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या शिवाय हे दुष्कर्म करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 

या वेळी उत्तर प्रदेश पोलिस मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. पीडितेचे काका गेल्या 35 वर्षांपासून आपल्या परिवारासह उल्हासनगर शहरात राहतात. हाथसरला जाण्यासाठी तिकीट न मिळाल्याने ते गावी जाऊ शकले नाहीत. 


हेही वाचा : उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा : शिवसेना 

मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश राज्य सरकारने बजावलेली दडपशाहीची भूमिका अन्यायकारक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. ही मागणी करून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला परतफेड केली आहे. कारण, कंगना प्रकरणावरून भाजपच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. 

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांसह चर्चगेट येथे रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. "दलित बेटी की जान गयी, सीएम, मोदीका ध्यान नही' अशा घोषणाही या वेळी शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला घेरण्यात आले होते. आता हाथरस बलात्कार प्रकरणी शिवसेनेने भाजपला घेरले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आज (ता. 2 ऑक्‍टोबर) शिवसेनेने निदर्शने केली. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com