प्रताप सरनाईकांना नातू असता तर त्यालाही चौकशीसाठी बोलावले असते 

असे विकृत राजकारण आम्ही करत नाही.
ED would have investigated Pratap Sarnaik's grandson too: Uddhav Thackeray
ED would have investigated Pratap Sarnaik's grandson too: Uddhav Thackeray

मुंबई : "आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही. नाहीतर त्याच्याही मागे ईडीची चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला, तर आधी इथे घेऊन या, ही विकृतीच आहे. असे विकृत राजकारण आम्ही करत नाही,'' अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत "महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे,' असा आरोप केला होता. त्या आरोपाचाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाचार घेतला.

महाष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप करण्यात आला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. 

ते म्हणाले की आमदार सरनाईक यांच्याबरोबर त्यांच्या मुलांचीही चौकशी करण्यात येत आहे. ही एक प्रकारची विकृती आहे. असे विकृत राजकारण आम्ही करत नाही. 

सभागृहात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले की, माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले आहे. आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचे ठरवले असेल तर माहीत नाही. मराठा आरक्षणाचा लढाई आपण सर्वानुमते लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी, अशी माझी प्रार्थना आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे. भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेले नाही. वेळोवेळी संघटनांबरोबर चर्चा चालू असते, अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकिलांबरोबर चर्चा करतात. ही लढाई सुरू असताना मध्येच कुणाच्या सडक्‍या डोक्‍यातून निघाले माहीत नाही. मराठा समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही. 

समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष घडवून आणण्याचा, आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर, त्या आगीवर पाणी टाकावे लागेल. आपण टाकले नाही तर, राज्यातील जनता पाणी टाकेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com