भाजपच्या खासदारासह कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण 

भिवंडीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सात जण अशा एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने भिवंडी तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.
Corona to eight members of the family, including a BJP MP
Corona to eight members of the family, including a BJP MP

भिवंडी : भिवंडीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सात जण अशा एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने भिवंडी तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून त्यांची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचा सल्ला खासदार पाटील यांना दिला आहे. 

खासदार कपिल पाटील हे भिवंडीतील हायवे दिवे येथील निवासस्थानी एकत्र कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी व तीन पुतणे यांच्यासह वास्तव्यास आहेत. कपिल पाटील यांच्या पत्नी यांना कुटुंबात सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला.

त्यांच्या संपर्कात घरातील व्यक्ती आल्याने सर्वांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीमध्ये खासदार कपिल पाटील, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या व त्याची पत्नी, तसेच दुसऱ्या पुतण्याची पत्नी असे एकूण आठ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असून खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने ते साध्य डॉक्‍टरांच्या सूचनेप्रमाणे होम क्वारंटाइन आहेत. 

या सर्वांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याची माहिती त्यांचे सचिव राम माळी यांनी दिली आहे. जनतेच्या सदिच्छांच्या बळावर पुन्हा नव्या जोमाने कार्यरत होण्याचे बळ मिळत असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले. सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आभार मानले आहेत. 

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार रात्रीपासून दहा दिवसांचा पुन्हा कडक लॉकडाऊन 

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या दोन पोलिस आयुक्तालयातील संपूर्ण हद्दीसह या शहरांजवळील चाकण, वाघोली, हिंजवडी या भागांत येत्या 13 जुलैपासून दहा दिवसांसाठी 23 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा आज करण्यात आली. फक्त अत्यावश्‍यक सेवा या कालावधीत सुरू राहणार आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ही साखळी ब्रेक झाल्यानंतर कोरोनाच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी या लॉकडाऊनचा उपयोग होणार आहे. 

या दोन्ही शहरांत कोरोनाच्या केसेस वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील दोन दिवस जनतेला पूर्वतयारीसाठी देण्यात आले आहेत. दूध, औषधे, भाजीपाला इतक्‍याच बाबी लॉकडाऊन काळात सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा आढावा आज बैठकीत घेतल्यानंतर त्याची घोषणा करण्यात आली. 

Edited By : Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com