केंद्र सरकारकडून ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २२ कोटींचा निधी 

कोरोना विषाणूच्या आपत्तीत लॉकडाउनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या तिजोरीत थेट केंद्र सरकारकडून निधी येणार आहे.
Central Government provides Rs. 22 crore to Gram Panchayats in Thane District
Central Government provides Rs. 22 crore to Gram Panchayats in Thane District

भिवंडी : कोरोना विषाणूच्या आपत्तीत लॉकडाउनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या तिजोरीत थेट केंद्र सरकारकडून निधी येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर, पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या माध्यातून ठाणे जिल्ह्यातील गावांना पहिल्या टप्प्यात २२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो संबंधित ग्रामपंचायतींना प्रदान करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील यांनी दिली. 

केंद्र सरकारकडून पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. कोरोनाच्या आपत्तीत ग्रामपंचायतींच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. आधीच तुटपुंजे उत्पन्न, त्यात करवसुली ठप्प झालेली, त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार जवळजवळ ठप्प झाला होता. या काळात ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळाल्यास दिलासा मिळणार आहे.

त्यानुसार केंद्र सरकारकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्हा परिषदेकडे २२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. आता ८० टक्के निधीचे थेट ४०३ ग्रामपंचायतींना वाटप केले जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या वाट्याला प्रत्येकी १० टक्के निधी येणार आहे, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. 

या निधीतून ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार असलेली कामे आणि उपक्रमांची अंमलबजावणी करता येणार आहे. विशेषत: कोरोनाच्या आपत्तीचा शहरांबरोबरच ग्रामीण भागालाही मोठा फटका बसला. घरपट्टी-पाणीपट्टी प्रलंबित असल्यामुळे ग्रामपंचायतींना विकासकामे करता येत नव्हती. मात्र, आता केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगाचा पहिल्या टप्प्यातील निधी मिळाल्यामुळे आता विकासकामे वेगाने होणार आहेत, असे मत खासदार पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

हे ही वाचा ः बापटांकडून पीएम केअर्सला निधी; पुणे महापालिकेस रुपयाचीही मदत नाही 


पुणे :पुणे शहरातील विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण अकरा आमदारांनी आपल्या विकास निधीतून १ कोटी ७९ लाख रुपये कोरोनावर उपचार करण्यासाठी महापालिकेला दिले आहेत. पण, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट तसेच, प्रकाश जावडेकर यांनी पुणे महापालिकेस एक रुपयाही उपलब्ध करून दिलेला नाही, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आकडेवारी जाहीर करून ही माहिती पुढे आणली आहे. 

खासदार गिरीश बापट यांना पत्रकारांनी सोमवारी विचारले होते की लॉकडाउन का केला. त्या वेळी त्यांनी या बाबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच विचारा, त्यांनीच लॉकडाउन लागू केला आहे, असे म्हटले होते. त्यानंतर काही वेळातच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा व नियोजन समितीमधील (डिपीडीसी) आकडेवारी जाहीर करत बापट यांच्यावर पलटवार केला आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com