भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी स्विकारला पदभार - Bhiwandi Deputy Commissioner of Police Yogesh Chavan accepted the post | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी स्विकारला पदभार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असुन आज सायंकाळी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

भिवंडी  : भिवंडी शहरात मागील दीड वर्षांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी यशस्वी पणे सांभाळणारे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची शासनाने मुंबई दहशतवाद विरोधी पथक ( गुप्त वार्ता )अधीक्षक पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असुन आज सायंकाळी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

 पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा,विधानसभा निवडणुकांसह सीएए विरोधातील आंदोलन मोर्चे व विशेष करून कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक रेल्वे भिवंडी येथून सोडताना मेहनत घेतल्याने त्यांच्याबद्दल भिवंडीत कौतुक झाले होते.

आज ईद निमित्ताने विशेष बंदोबस्त संपन्न करून सायंकाळी 5:30 वा.त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नवनिर्वाचित पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा पदभार दिला. 

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गावीत,प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक विजय डोळस, सुभाष कोकाटे, कल्याण कपेँ, ममता डिसोझा यांच्या सह पोलीस अधिकारी व शहरातील विविध मान्यवर व शांतता समीती सदस्यांनी राजकुमार शिंदे व योगेश चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख