पोलिस आयुक्तांचा दणका; चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई  - Action against four senior police officers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

पोलिस आयुक्तांचा दणका; चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 जुलै 2021

मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल पंधरा डान्स बार ठाणे महापालिकेने सीलबंद केले.

ठाणे : कोरोनामुळे (Covid-19) राज्य सरकारने टाळेबंदी (Lockdown) लागू केली आहे. आजही अनेक आस्थापने बंद आहेत. दुसरीकडे मात्र ठाणे शहरातील डान्स बार तेजीत सुरू असल्याचे दिसून आले. या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत, दोन सहायक पोलिस आयुक्तांसह दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल पंधरा डान्स बार ठाणे महापालिकेने सीलबंद केले. या कारवाईमुळे ठाणे शहरातील डान्स बार चालकांचे धाबे दणाणले आहे. (Action against four senior police officers) 

हेही वाचा : गणेश नाईकांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

मागील दीड वर्षापासून राज्यभरासह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापलिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभाग अहोरात्र झटत असून दुसरीकडे टाळेबंदीदेखील करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे शहरात या टाळेबंदीच्या काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

असे असताना ठाणे शहरात ऑर्केस्ट्रा बार ऍण्ड रेस्टॉरंट (डान्स) सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांना मिळताच त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांना याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर ठाणे शहर दलातील चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ऑर्केस्ट्रा बार ऍण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केला आहे. एकूण १५ बार सील करण्यात आले.

हेही वाचा : फडणवीसांची कबुली; निवडणूक निकालानंतर अधिकारी इस्त्राईलला गेले पण...

या अधिकाऱ्यांवर कारवाई

नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल मांगले, वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित करून मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. तसेच नौपाडा विभागाच्या साहायक पोलिस आयुक्त नीता पाडवी व वर्तकनगर विभागाच्या साहायक पोलिस आयुक्त पंकज शिरसाट या दोघांना नियंत्रण कक्षात संलग्न केले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख